🌟साहित्यिक,प्रकाशक,साहित्य मंडळांची सूची 'साहित्यदिंडी'चे प्रकाशन संपन्न.....!


🌟'साहित्यदिंडी'चे प्रकाशन महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या हस्ते संपन्न🌟

छत्रपती संभाजीनगर -  मराठी साहित्यिक, ग्रंथप्रेमी, संपादक, प्रकाशक, चित्रकार, ग्रंथविक्रेते, साहित्य मंडळे यांच्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या 'साहित्यदिंडी'चे प्रकाशन महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या हस्ते संपन्न झाले.

    साहित्यिक, संपादक, प्रकाशक, चित्रकार, ग्रंथविक्रेते यांची सूची व सोबतच ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य पुरस्कारांचे मानकरी, २०२३मधील प्रकाशित पुस्तके आदी माहितीचा समावेश असलेली 'साहित्य दिंडी' इसाप प्रकाशनातर्फे प्रकाशनासाठी सिद्ध करण्यात आली होती. या 'साहित्यदिंडी'चा प्रकाशन समारंभ छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. 

     प्रारंभी संपादक, प्रकाशक दत्ता डांगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच मराठी साहित्य चळवळ ही गतिमान व्हावी, खेडोपाडी व वाडीतांड्यावरही लहान-मोठी साहित्य संमेलने व्हावीत, तेथील नवोदित लेखक, लेखिकांच्या साहित्याला प्रसिद्धी मिळावी, यथावकाश त्यांची पुस्तकेही प्रकाशित व्हावीत या उद्देशाने ही 'साहित्य दिंडी....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या