🌟स्व.प्रशांत जोशी हे दैनिक मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक होते🌟
✍️ मोहन चौकेकर
मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्याने अखेर दै मराठवाडा साथीचे दिवंगत कार्यकारी संपादक प्रशांत जोशी यांच्या पत्नी श्रीमती जयश्री प्रशांत जोशी यांच्या बँक खात्या मध्ये शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी मधून 1 लाख रुपये जमा झाल्याने जोशी कुटुंबीयांनी मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
दै मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक व मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य राहिलेले प्रशांत प्रभाकर राव जोशी यांचे काही महिन्या पूर्वी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या मुळे त्यांच्या परिवारास मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने तातडीची मदत तर दिलीच शिवाय राज्य शासनाच्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी मधून आर्थिक मदत मिळावी या साठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा एस एम देशमुख व किरण नाईक, राज्य कार्यकारणी सदस्य विलास डोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक दत्तात्रय अंबेकर यांनी जिल्हा माहिती अधिकारी बीड यांच्या मार्फत प्रस्ताव दाखल केला.
जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठनकर व माहिती अधिकारी सौ अंजली निमसरकर आणि त्या नंतर संभाजी नगर येथील विभागीय माहिती संचालक किशोर गांगुर्डे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रस्ताव माहिती व संचालनालय मुबंई यांच्या कडे पाठवला. हा प्रस्ताव माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुंबई येथे गेल्या नंतर एप्रिल महिन्या मधेच या प्रस्तावाच्या आधारे 1 लाख रुपये मंजूर करण्यात आले. जुलै महिन्याच्या 25 तारखे पर्यंत मंजूर झालेले 1 लाख रु स्व प्रशांत जोशी यांच्या पत्नीच्या खात्यात जमा न झाल्याने परत विलास डोळसे, दत्तात्रय अंबेकर यांनी पाठपुरावा सुरू केला. मा किरण नाईक यांनी स्वतः मंत्रालयात जाऊन माहिती घेतली असता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागातील घाडगे मॅडम यांच्या कडुन सांगण्यात आले की 22 एप्रिल रोजीच पैसे जयश्री जोशी यांच्या खात्यावर पाठवले. या संदर्भात सखोल माहिती घेतल्या नंतर समजले की काही तांत्रिक अडचणी मुळे हे पैसे जयश्री जोशी यांच्या खात्यात जमा झाले नव्हते.
ही बाब घाडगे मॅडम यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी लागलीच सर्व बाबीची पूर्तता करून 1 ऑगस्ट रोजी घाडगे मॅडम यांनी जयश्री जोशी यांच्या बँक खात्यावर 1 लाख रु पाठवले आणि ती रक्कम त्यांना प्राप्त ही झाली या सर्व पाठपुराव्यात मा धनंजय मुंडे यांचे स्वीयसहाय्यक प्रशांत जोशी सह मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, विभागीय संघटक सुभाषजी चौरे, डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष अनिलजी वाघमारे यांचे ही सहकार्य लाभले मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्याने 1 लाख रु मिळाल्याने संपूर्ण जोशी कुटुंबियांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या