🌟जिल्ह्यातील पालम तालुक्यात सर्वाधिक 55.6 मिलिमीटर पाऊस🌟
परभणी (दि.01 ऑगस्ट 2024) :- परभणी जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 16.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पालम तालुक्यात सर्वाधिक 55.6 मिलिमीटर पाऊस पडला आहे.
परभणी जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. परभणी 6.5 (382.4), गंगाखेड 30.8 (531.7), पाथरी 15.2 (360.1), जिंतूर 12.9 (448.8), पुर्णा 15.6 (406.7), पालम 55.6 (496.7), सेलू 4.4 (381.4) सोनपेठ 10 (413.5) आणि मानवत तालुक्यात 10 (394.9) पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.
परभणी जिल्ह्यात दिनांक 1 जून 2024 ते 01 ऑगस्ट 2024 पर्यंत सरासरी 394.9 मिलीमीटर पाऊस पडला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात गेल्या 24 तासात सरासरी 8.5 मि.मी. (422) पावसाची नोंद झाली आहे.......
*****
0 टिप्पण्या