🌟बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराचा निषेधार्थ उद्या 18 ऑगस्ट रोजी परभणीत विराट हिंदू मोर्चा निघणार....!


🌟सकल हिंदू समाजाकडून विराट मोर्चाचे आयोजन🌟  

परभणी (दि.17 ऑगस्ट 2024) : बांगलादेशातील हिंदू समाजावर होणार्‍या हल्ल्यांसह अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या रविवार 18 ऑगस्ट रोजी शनिवार बाजार मैदानावरुन सकाळी 10.00 वाजता विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.

             मागील काही दिवसांपासून बांगलादेशात   हिंसाचार उफाळून असुन बांग्लादेशातील अनेक हिंदु  बांधव, भगिनीवर अमानुष आत्याचार होत आहे. तसेच हिंदु मंदीरावर हल्ले होत असुन हिंदु देवतांच्या मूर्तीची विटंबना करण्यात येत आहे. सदरील घटनेचा सकल हिंदुस्थानातील हिंदु बांधवाच्या भावना दुखल्या असुन याचा संबंध भारत देशात निषेध करण्यात येत आहे.  

              या पार्श्‍वभूमीवर परभणीतील सकल हिंदु समाज रस्त्यावर उतरून बांग्लादेश हिंसाचारच्या विरोधात निषेध, रोष व्यक्त करत विराट मोर्चा काढणार आहे. या संदर्भात परभणीतील हिंदुबांधव च्या उपस्थित व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीत सर्व स्तरातील हिंदु बांधव, महंत, युवक, व्यापारी वर्ग यांची उपस्थित लक्षणीय होती. बैठकीत मोर्चाच्या अनुषांगाने अनेकांनी आपले मत व्यक्त केले. केंद्र सरकारने बांग्लादेशातील हिंदु समाजवर होत आसलेल्या आत्याचार थांबावेत यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेत आवाज उठवावा, बांग्लादेशातील हिंदुना भारतात आश्रय द्यावा, भारत देशातील बांग्लादेशातील  घुसखोरांवरती कडक कारवाई करावी,  असा सूर व्यक्त करण्यात आला होता.

            या प्रमुख मागणी साठीच सकल हिंदु समाजाच्या वतीने दि.18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठिक 10वा शनिवार बाजार मैदान येथुन मोर्चाला  काढण्याचा संकल्प सोडण्यात आला होता. शहरातील मुख्य रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  हा मोर्चा धडकणार  आहे. याच ठिकाणी जिल्हाधिकार्‍यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, जास्तीत जास्त संख्येने संपुर्ण परभणी शहरातील हिंदु बांधव, युवक, युवती माता भगिनींनी व नागरीकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या