🌟आगामी विधानसभा निवडणूकीत प्रत्येक पक्षाने 50 टक्के जागांवर ओबीसींना उमेदवारी द्यावी - अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर


🌟परभणीत आरक्षण बचाव यात्रेचे जल्लोषात स्वागत🌟


परभणी (दि.02 ऑगस्ट 2024) : आगामी विधानसभा निवडणूकीत प्रत्येक पक्षाने आपल्या हिश्शास मिळणार्‍या जागांपैकी 50 टक्के जागांवर ओबीसी उमेदवार उभे करावेत, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

               वसमत रस्त्यावरील अक्षदा मंगल कार्यालयाच्या सभागृहात ओबीसी आरक्षण बचाव यात्रे निमित्त गुरुवारी रात्री उशीरा आयोजित केलेल्या जाहीरसभेप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे हे होते. तसेच प्रमुख मार्गदर्शिका म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती रेखा ठाकूर ह्या उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर  अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार, नानासाहेब राऊत,  किर्तीकुमार बुरांडे, कृष्णा कटारे, ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे मुख्य समन्वयक अविनाश भोसीकर, रमेश बाविस्कर, वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष गोविंद दळवी, नागोराव पांचाळ, वंचित बहुजन आघाडीचे विभागीय प्रवक्ता डॉ. धर्मराज चव्हाण, माजी नगरसेवक विशाल बुधवंत, माजी नगरसेवक राजेंद्र वडकर, वंचितचे दक्षिण  जिल्हाध्यक्ष सुनील मगरे आदी विराजमान होते.

            यावेळी अ‍ॅड. आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून ओबीसी प्रत्येक पक्षातील ओबीसी नेते मंडळींसह संभाव्य उमेदवारांनी 50 टक्के जागा ओबीसी समाजाच्या उमेदवारांना कशा मिळतील यासाठी प्रयत्न करावेत व त्या जागा पदरात पाडून घ्याव्यात असे स्पष्ट करीत जे पक्ष 50 टक्के  जागांवर ओबीसी उमेदवार देणार नाहीत, त्या पक्षाशी निवडणूकीपुरती प्रत्येक ओबीसी नेत्याने व संभाव्य उमेदवाराने फारकत घ्यावी, असाही सल्ला दिला. दरम्यान, या सभेस मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.


जिल्ह्यात यात्रेचे जोरदार स्वागत...

             वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील चैत्यभूमी येथून 25 जूलै रोजी निघालेल्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे गुरुवारी दुपारी परभणी जिल्ह्यातील ढालेगावात आगमन झाले. त्यावेळी पाथरीतील कार्यकर्त्यांनी यात्रेचे जोरदार स्वागत केले. तेथून सभा आटोपून यात्रेचे मानवत शहरात आगमन झाले. त्या ठिकाणीही सकल ओबीसी समाजाच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात आले. तेथून रात्री उशीरा यात्रेने परभणीकडे प्रस्थान केले तेव्हा परभणीतील विसावा चौकात या यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी परभणी जिल्हा पक्ष निरीक्षक ऍड. गोविंद दळवी, डॉ.धर्मराज चव्हाण, प्रा.डॉ.सुरेश शेळके, यात्रेचे समन्वयक ऍड.अविनाश भोसीकर, रमेश बारस्कर, इंजि सुरेश फड,  जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, ज्येष्ठ नेते भगवानराव वाघमारे,  अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार, नानासाहेब राऊत, किर्तीकुमार बुरांडे, माजी नगरसेवक राजेंद्र वडकर, विशाल बुधवंत, तुकाराम भारती, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनिता साळवे, युवा आघाडीचे, जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, सुनील जाधव, सुमित भालेराव, परभणी शहराध्यक्ष रणजीत मकरंद, प्रमोद कुटे  यांच्यासह परभणी जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असणारे ओबीसीचे नेते उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या