🌟परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महाडीबीटीवर अर्जासाठी 6 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ....!


🌟ऑनलाईन अर्ज करुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल गवळी यांनी केले🌟 

परभणी (दि.02 ऑगस्ट 2024) :- राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2024-25 अंतर्गत 100 टक्के अनुदान तत्वावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचा लाभ घेण्याकरिता जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी महाडिबीटी या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल गवळी यांनी केले आहे. 

सोयाबीन व इत्तर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देवून शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करुन सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना रान 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.

सन 2024-25 मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगाम मध्ये बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप 100 टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया पोर्टलवर सुरू असुन सद्यस्थितीत जिल्ह्यातील शेतक-यांच्या अर्जाची संख्या खूप कमी प्रमाणात असल्यामुळे दि. 6 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईट जाऊन फॉर्मर लॉगिन मध्ये लाभार्थी शेतकरी यांचे युजर आयडी व पासवर्ड टाकणे. अर्ज करा बाबीवर क्लिक करणे. कृषि यांत्रिकीकरण बाब निवड यावर क्लिक करणे. मुख्य घटक बाबीवर क्लिक करणे. कृषि यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य तपशिल या बाबीवर क्लिक करून मनुष्यचलित औजारे घटक निवडणे. यंत्र/औजारे व उपकरणे बाबीवर क्लिक करून पिक संरक्षण औजारे निवडणे. मशीनचा प्रकार बाबीवर क्लिक करून बैटरी संचलीत फवारणी पंप (गळीतधान्य) निवडणे व जतन करावे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या