(नाशिक जिल्ह्यातील कळवण-सुरगाणा,जांबुटाके तर अहिल्या नगर (अहमदनगर) जिल्ह्यातील अकोले, लिंगदेव तर अमरावती जिल्ह्यातील वरुड तर गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज आदी ठिकाणी उभारणार नवीन एमआयडीसी)
✍️ मोहन चौकेकर
राज्याच्या उत्पन्नवाढीबरोबरच रोजगार निर्मितीसाठी उद्योगांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक,अहिल्यानगर,अमरावतीसह गडचिरोली जिल्ह्यात नवीन एमआयडीसी उभारणार असल्याची घोषणा केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील लिंगदेव, अकोले, नाशिक जिल्ह्यातील कळवण-सुरगाणा, जांबुटके तसेच अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे एमआयडीसी उभारण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करावेत. तसेच राज्यात यापुढे नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी किमान शंभर एकर जमिनीची उपलब्धता करुन देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले आहेत.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी येथे राज्यासह केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या