🌟सदर गुन्हांच्या तपासात अथक परिश्रम घेणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहनपर बक्षिस जाहिर🌟
फुलचंद भगत
वाशीम :- पोलीस स्टेशन मानोरा येथे दिनांक ०६/०८/ २०२४ रोजी ग्राम इंझोरी येथील पोलीस पाटील यांच्या प्राप्त माहीतीनुसार ग्राम इंझोरी जवळील अडान नदीच्या पात्रात अज्ञात पुरुष जातीचे प्रेत पाण्यावर तरंगत आढळुन आल्याने सर्व धर्म आपतकालीन पथकाच्या मदतीने स्थानिक पोलीस व प्रशासन यांनी घटनास्थळी जावुन अज्ञात इसमाचे प्रेत पाण्याच्या बाहेर काढले. सदर प्रेताचे ग्रामिण रूग्णालय, मानोरा येथे शवविच्छेदन करण्यात आले. सदर अज्ञात इसमाचा मृत्यु हा नैसर्गिक नसुन खुन असल्याने पो.स्टे. मानोरा येथे अज्ञात आरोपी विरूध्द खुनाचा गुन्हा नोदविण्यात आला. यातील मृतक हा अनोळखी असल्याने त्याची ओळख पटविणे व खुनाचे कारण आणि अज्ञात आरोपी निष्पन्न करणे हे पोलीसांपुढे आव्हान होते.
सदरचे घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे. अपर पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे, पोलीस उपअधीक्षक श्री प्रदिप पाडवी, पोलीस निरीक्षक श्री. रामकृष्ण महल्ले यांनी मानोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली. गुन्हयाची उकल करण्यासाठी वेगवेगळे पथक तयार करण्यात आले.तपासादरम्यान दि. ०७/०८/२०२४ रोजी सदर अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून मृतकाचे नाव प्रल्हाद दत्तराम विर, वय ७५ वर्षे रा. मंगरूळपीर रोड, सोमठाणा, मानोरा असे निष्पन्न झाले.पथकांच्या अथक परिश्रमानंतर तपासदरम्यान गुन्हयातील आरोपी नामे प्रतिक संतोष विर वय २३ वर्षे रा. मंगरूळपीर असल्याचे निष्पन झाले. त्यास ताब्यात घेउन केलेल्या तपासादरम्यान गुन्हयात इतर तीन आरोपी नामे ०१. जिवन भगवान फाळके वय २७ वर्षे रा विठोली ०२. जगदीस अनिल देवकर वय २४ वर्षे रा. शिवाजी नगर धामणी ०३. विकास संतोष भगत वय २५ वर्षे रा. डोंगरगाव यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडे प्राथमिक तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की मुख्य आरोपी प्रतिक संतोष विर याने त्याचे साथीदारंसह दिनांक ०४/०८/२०२४ रोजी सायंकाळी मृतक यांच्या राहत्या घरी जावुन प्रॉपर्टी व आर्थिक बाबी संबधाने वाद उकरून त्यांच्यावर कोयत्याने प्राणांतिक हल्ला केला, तसेच आरोपीची आजी निर्मला प्रल्हाद विर या वाचवण्यासाठी मध्ये आल्या असता त्यांचाही खुन केला. या प्राणघातक हल्ल्यात प्रल्हाद दत्तराम विर, वय ७५ वर्षे व निर्मला प्रल्हाद विर दोन्ही रा. मंगरूळपीर रोड, सोमठाणा, मानोरा यांचा मृत्यु झाला.त्यानंतर आरोपी यांनी मृतकांच्या अंगावरील मौल्यवान दागिने व त्यांचे मोबाईल काढुन रात्री उशिराने दोन्ही मृतदेह मयताचे चारचाकी गाडीत टाकुन इंझोरी गावासमोरील अडान नदीपात्रात फेकुन दिले. प्राप्त माहिती नुसार वेगवेगळया पोलीस पथकांनी कसोशीने दुहेरी खुनाची घटना उघडकीस आणली. तसेच स्थानिक नागरीक व आपतकालीन पथक यांचे मदतीने दि ०८/०८/२०२४ रोजी निर्मला विर रा. सोमठाणा यांचा मृतदेह नदीपात्रातुन शोधुन काढण्यात यश प्राप्त झाले आहे.सदरचा गुन्हयाचा घटनाक्रम पाहता नदीत सापडलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवुन संशयीताचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेवुन दुहेरी हत्याकांडाची अवघ्या २४ तासात उकल वाशिम जिल्हा पोलीसदलातर्फे करण्यात आली आहे.
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक अनुज तारे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री भारत तांगडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदीप पाडवी, पोनि रामकृष्ण महल्ले यांचे मार्गदर्शनात मानोरा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोनि प्रविण शिंदे करीत आहेत. सायबर सेल यांनी तांत्रिक बाबींचा तपास उत्तमरित्या केला. सदर गुन्हा उघडकीस आणण्यात मानोरा व स्थागुशा येथील तपास पथक सपोनि योगेश धोत्रे, सपोनि प्रदिप अलापुरकर, पोउपनि रामेश्वर नागरे, पोउपनि अभिजित वारे, पोलीस अमलदार राहुल जयसिंगकार, मदन पुणेवार, सुभास महाजन, रविंद्र राजगुरे, दिलीस चव्हाण, दिपक राठोड, गजानन अवगळे, गजानन झगरे, राजु राठोड, गजानन गोटे, मयुरेश तिवारी, ज्ञानेश्वर राउत, आशिष एकाडे, मनिष अगलदरे, फिरोज खान, रोहन तायडे, अनिस निन्नसुरवाले. चालक विजय राठोड, करण चव्हाण, संदिप डाखोरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.सदरच्या कामगिरीबाबत पोलीस अधिक्षक वाशिम यांनी नमुद गुन्हांच्या तपासात अथक परिश्रम घेणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहनपर बक्षिस जाहिर केले आहे......
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
0 टिप्पण्या