🌟गायन स्पर्धेत मराठवाडा हायस्कूल प्रथम : महापालिकेद्वारे आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद🌟
परभणी (दि.16 ऑगस्ट 2024) :- परभणी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद व परभणी महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य देशभक्तीपर गीत गायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये जिल्हा परिषद शाळा वडी या संघाने नृत्य स्पर्धेत तर मराठवाडा हायस्कूल परभणी या संघाने गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
शहरातील बी. रघुनाथ सभागृहात गुरुवार 15 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त आयुक्त मिनिनाथ दंडवते उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, उपायुक्त दंडवते, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, निळकंठ पाचंगे, कोषागार अधिकारी व शिक्षणाधिकारी आशा गरुड, उपशिक्षणाधिकारी गणराज यरमळ, मनपा शिक्षण विभागप्रमुख मंजुर हसन, महिला बालकल्याण अधिकारी शिवाजी सरनाईक, सहाय्यक आयुक अल्केश देशमुख, नगरसचिव विकास रत्नपारखे, सहाय्यक आयुक आवेज हाश्मी, सांस्कृतिक विभाग प्रमुख राजकुमार जाधव, भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी यांची यावेळी उपस्थिती होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांती उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेतील परीक्षणाची जबाबदारी डॉ. सिद्धार्थ मस्के व डॉ. सुनिल तुरुकमाने, चित्रकला स्पर्धेचे परीक्षक केशव लग्गड यांनी पार पाडली.
दरम्यान, देशभक्तीपर समुहनृत्य स्पर्धेत पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी या शाळेने प्रथम, के.जी.बी.व्ही. मानवत द्वितीय तर जवाहर विद्यालय जिंतूर या शाळेने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच गायन स्पर्धेत एनव्हीएस मराठवाडा हायस्कूल परभणी या शाळेने प्रथम तर बालविद्या मंदिर हायस्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्याहस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोविंद मोरे, इख्तीयार पठाण, आण्णासाहेब जल्हारे, जयदत्त गडेराव, त्र्यंबक वडसकर आदिंनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण वायकोस यांनी केले तर शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद मोरे यांनी आभार मानले.....
0 टिप्पण्या