🌟पुर्णेतील बुद्ध विहारात श्रावण पौर्णिमेनिमित्त आयोजित धम्मदेशना व सत्कार समारंभात बोलताना ते म्हणाले🌟
पुर्णा :- पुर्णेतील बुद्ध विहारात श्रावण पौर्णिमेनिमित्त दिनांक 19 ऑगस्ट 2024 जाहीर धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष डॉ.उपगुप्त महाथेरो भदंत पयावंश,भदंत संघरत्न यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते सकाळी साडेपाच वाजता बुद्ध विहारांमध्ये परित्राण पाठ त्रिरत्न वंदना व सूत्रपठण घेण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिला मंडळाची उपासक उपासिकांची संख्या होती दुपारी 12.30 वाजता जाहीर धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांचा बुद्ध विहार समितीच्या वतीने शाल पुष्पहार धम्म परिषद स्मरणिका देऊन त्यांचा यथोची सत्कार करण्यात आला भिक्खू संघाच्या वतीने भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत पयावंश भदंत संघरत्न यांच्या वतीने महामानव तथागत भगवान बुद्धाची मूर्ती देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे नगरपालिकेचे गटनेते उत्तम भय्या खंदारे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड नगरसेवक एडवोकेट धम्मा जोंधळे मधुकर गायकवाड मुकुंद भोळे उद्योजक गौतम भोळे रेल्वे इलेक्ट्रिकल इंजिनियर प्रदीप कुमार भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड पत्रकार विजय बगाटे बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक तुकाराम ढगे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड साहेबराव सोनवणे मुकुंद पाटील अतुल गवळी किशोर ढकरगे आदींची उपस्थिती होती.
आपल्या प्रमुख भाषणामध्ये डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी अंगुली माला यांच्यामध्ये कशा पद्धतीने परिवर्तन झाले बुद्ध धम्माकडे कसे ते वळले. याविषयी त्यांनी यथोचित संबोधित केले.संपूर्ण जगाला बुद्ध धम्माच्या विचाराची गरज आहे भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या कुशल मार्गदर्शनातून मराठवाड्यामध्ये बुद्ध धम्म चळवळ गतिमान होताना दिसत आहे पूर्णा येथील बुद्ध विहाराला विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशा प्रकारे त्यांनी आश्वासित केले आपल्या प्रास्ताविकामध्ये भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी श्रावण पौर्णिमेचा महत्त्व विशद केले भदंत पयावंश व भदंत संघरत्न यांनी आपल्या धम्मदेशनेमध्ये दानपरामीतेचे महत्व धम्मा मधील शील सदाचार मानवता हे महान तत्व याविषयी यथोचित मार्गदर्शन केले झाले की नाही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले.....
0 टिप्पण्या