🌟परभणी शहरातल्या विकासा संदर्भातील विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण....!



🌟सामाजिक कार्यकर्ते अतिश गरड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु🌟 

परभणी (दि.14 ऑगस्ट 2024) : परभणी शहरातील सार्वजनिक रस्ते तसेच पिण्याचे पाणी व स्वच्छतेसह अनेक प्रश्‍न गंभीर बनले असून परभणी महापालिका याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते अतिश गरड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

          शहरातील विकासा संदर्भात अतिश गरड यांनी आज बुधवार दि.14 ऑगस्ट रोजी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना एक निवेदन सादर केले त्याद्वारे, शहरात नागरिकांच्या मुलभूत सुविधा आणि दैनांदिन जीवनातील समस्या जाणून घेवून त्या समस्यांचे निराकरण करणे महानगरपलिकेची संवैधानिक जबाबदारी आहे. परंतु, परभणी महानगरपलिका यामध्ये सपशेल अपयशी ठरल्याचे दिसू येत आहे. वारंवार निवेदन देवून, आंदोलन करुनही मनपा प्रशासनाद्वारे दखल घेतली जात नाही, त्यामुळे आपण आमरण उपोषण करत आहोत, असे या निवेदनात म्हटले आहे.

              शहरातील मुख्य रस्त्यांसह राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरीकांना वेळेवर पाणी पुरवठा केला जात नाही. शहरात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. परिणामी नागरीकांच्या आरोग्या प्रश्‍नही निर्माण झाला आहे. शहरात प्रमुख रस्त्यांसह विविध प्रभागांमध्ये स्ट्रीट लाईट बंद आहेत. नियमितपणे नाल्यांची सफाई होत नाही, असे एक ना अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. परंतु, या प्रश्‍नांबाबत महानगरपलिका प्रशासनाला गांभीर्य रहिलेले नाही. यामुळे जोपर्यंत हे प्रश्‍न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत आपले जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण सुरु राहील, असेही गरड यांनी या निवेदनात म्हटले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या