🌟पुर्णा तालुक्यातील सुहागण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी...!


🌟यावेळी जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती🌟 

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील सुहागण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज गुरुवार दि.०१ऑगस्ट २०२४ रोजी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी शाळेतील सहशिक्षक गंगाधर लोखंडे यांनी विद्यार्थ्यांपुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व्याख्यान दिले. जयंतीच्या कार्यक्रमास शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भोसले, मुख्याध्यापक साईनाथ रामोड, मनसे तालुकाध्यक्ष आनंद बुचाले, सहशिक्षक हिरामण वैद्य, सहशिक्षक सुर्यकांत खानापूरकर, खुशाल भोसले, पांडूरंग भोसले, शुभम भोसले, दिपक भोसले, भागवत भोसले, प्रल्हाद भोसले व विद्यार्थी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या