🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात राजीव गांधी यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन....!


🌟अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी दिली सद्भावना दिनाची प्रतिज्ञा🌟

परभणी (दि.२० ऑगस्ट २०२४) : दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे  यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी -कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.

अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. "जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची" प्रतिज्ञा अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी यावेळी उपस्थितांना दिली. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या