🌟पक्षाच्या जिल्हा शाखेने ०५ सप्टेंबर पर्यंत अर्ज मागविले आहेत🌟
परभणी :- परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांतर्गत निवडणूक लढवू इच्छिणार्या उमेदवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा शाखेने ०५ सप्टेंबर पर्यंत अर्ज मागविले आहेत.
या पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अॅड.विजय गव्हाणे यांनी गुरुवार दि.२९ ऑगस्ट २०२४ रोजी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे गंगाखेड,जिंतूर,पाथरी व परभणी या चारही विधानसभा मतदारसंघांतर्गत निवडणूक लढवू इच्छिणार्या उमेदवारांना उमेदवारी मागणी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे. इच्छुकांनी ०५ सप्टेंबर २०२४ पर्यंत पक्षाच्या विहित नमून्यातील तो उमेदवारी अर्ज अर्जासोबत पार्टीच्या नावे दहा हजार रुपयांचा डीडी तसेच पक्षाचे मूखपत्र असणार्या मासिकासाठी ५०० रुपये शुल्क व ०१ हजार रुपये सदस्य फिस जमा करावी असे आवाहन केले आहे. इच्छुक उमेदवारांनी जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालय परिसरातील कार्यालयात रितसर अर्ज करुन अर्ज दाखल करावे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस रमाकांत कुलकर्णी यांनी केले आहे......
0 टिप्पण्या