🌟गोरगरीब कुटुंबातील मयतांची मृत्यूनंतर देखील अव्हेलना : ग्रामपंचायत प्रशासनासह तहसिल प्रशासनाचे वेळकाढू धोरण🌟
भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७८ वर्ष होत असतांना देखील जाती प्रथेच्या अत्यंत आत्मघातकी गुलामगिरीतून शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब मागासवर्गीय जनमानस मुक्त झाला नसल्याचे निदर्शनास येत असून जिवंत असतांना वेळोवेळी अवमानाचा विषारी घोट पिणाऱ्या मागासवर्गीय समाजातील मयतांना मृत्युनंतर देखील वेगळ्या स्मशानभूमी अभावी प्रचंड अव्हेलना सहन करावी लागत असल्याचा गंभीर प्रकार पुर्णा तालुक्यातील मौजे बरबडी गावात घडतांना निदर्शनास येत आहे.
पुर्णा तालुक्यातील मौजे बरबडी येथील गावातील रहिवासी असलेल्या मातंग समाजातील महादू संतोबा बनसोडे यांचा दि.२० ऑगस्ट २०२४ रोजी अल्पशा आजाराने बडबड येथे दुर्दैवी मृत्यू झाला मागासवर्गीय म्हणून आजिवन विषारी जातीयव्यवस्थेत अवमानित जिवन व्यथित केलेल्या त्या बिचाऱ्याला काय माहित मृत्यूनंतर देखील वेगळ्या स्मशानभूमी अभावी त्याच्या मृतदेहाला अव्हेलना सहन करावी लागेल म्हणून ? अत्यंत हृदयविदारक बाब म्हणावी लागेल की हिंदू धर्माशी एकनिष्ठ राहून देखील या मातंग समाजावर जातीय वर्णव्यवस्थेतून लागलेला हा मागासवर्गाचा ठपका त्यांच्या मृत्यूनंतर देखील अव्हेलनेसह मानसिक छळवणूकीस कारणीभूत ठरेल यावर निश्चितच कोणालाही विश्वास बसणार नाही परंतु हा प्रकार आज देखील बडबडी गावात वेळोवेळी होतांना पाहावयास मिळत असून गावातील मातंग समाजातल्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती मयत झाली की त्याच्या अंत्यसंस्काराचा गंभीर व हृदयविदारक प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे असाच प्रकार दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी बरबडी गावात घडला महादू संतोबा बनसोडे यांच्या अल्पशा आजाराने झालेल्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बनसोडे कुटुंबासह मातंग समाज बांधवांना त्यांचा मृतदेह अक्षरशः सात ते आठ किलोमीटरचे अंतर पायी पायपीट करून पुर्णा येथील पुर्णा नदी काठावरील पुर्णा नगर पालिकेच्या स्मशान भूमीमध्ये दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ०१.३० वाजता आणून त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावा लागला ही अत्यंत हृदयविदारक आणि मानवतेला कलंकित करणारी घटना म्हणावी लागेल या हृदयविदारक दुःखद घटनेत गावामध्ये वेगळी स्मशानभूमी नसल्यामुळे मातंग समाजातील गरीब बांधवांना अनवाणी पाण्याविना पुर्णेच्या समशानभूमीपर्यंत पायी पायपीट करीत चालत याव लागले त्यावेळी पुर्णा स्मशानभूमीत या दुःखद घटनेवेळी आवर्जून उपस्थित असलेले लाल सेनेचे मराठवाडा प्रवक्ता प्रकाश गायकवाड म्हणाले की मयत बनसोडे यांच्या मृतदेहाची झालेली विटंबना आणि त्यांच्या कुटुंबीयांसह समस्त मातंग समाज बांधवांना झालेल्या झालेला प्रचंड मानसिक त्रास यासाठी प्रशासन जवाबदार असून राज्यात मातंग समाजावरील अन्याय अत्याचारांच्या घटना सातत्याने वाढत असून या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अपयशी ठरत आहे महाराष्ट्र सरकारने मातंग समाजावर होणारा अन्याय अत्याचार त्वरित थांबवण्याच्या दृष्टीने पाऊल उचलली नाही तर भविष्यात यांचे गंभीर दुष्परिणाम होतील व यापुढे मातंग समाजाच्या कोणत्याही ज्येष्ठ नागरिक माता बहिणी किंवा बालकाचा मृत्यू झाल्यास त्या गावात त्यांना समशानभूमी नाही मिळाल्यास लाल सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील लाल सेनेचे मराठवाडा प्रवक्ते प्रकाश गायकवाड यांनी दिला यावेळी समशान भूमी मध्ये मयत बनसोडे यांच्या सरणाला अग्नी देत असताना त्यांच्या आत्म्यातून समाजातील तळमळीचे शब्द बाहेर पडत होते यावेळी त्यांनी प्रशासनाला जाहीर जाब विचारला आहे की मौ.बरबडी येथील मातंग समाजाला स्मशानभूमी साठी हक्काची जागा उपलब्ध करून देऊन प्रशासन शेवटी केव्हा केव्हा न्याय देणार अश्याच प्रकारे जर मातंग समाजाला अंत्यसंस्कारासाठी सात ते आठ किलोमीटरचे इतर गावात जाण्याची वेळ आल्यास यापुढे लाल सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ही प्रकाश गायकवाड यांनी शासनाला दिला आहे.....
0 टिप्पण्या