🌟पुर्णेतील पत्रकार भवनाचे स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.समाधान पाटील यांनी केले उद्घाटन....!


🌟यावेळी 'पत्रकार भवन' उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 


पुर्णा (दि.१७ ऑगस्ट २०२४) :- पुर्णा शहरातील मुख्य बाजार पेठेतील पुर्णा नगर परिषदेच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुलाच्या द्वितीय मजल्यावरील एक गाळा पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पत्रकार भवनासाठी बहाल करण्यात आला असून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुरुवार दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी या ठिकाणी पत्रकार भवनाचे उदघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.समाधान पाटील यांच्या हस्ते थाटात करण्यात आले.


यावेळी 'पत्रकार भवन' उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून महसूल प्रशासनातील अधिकारी तथा नायब तहसीलदार प्रशांत थारकर,पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती या यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद तालुकाध्यक्ष मुजीब कुरेशी,शहराध्यक्ष मोहन लोखंडे यांनी पुढाकार घेऊन पत्रकार भवन परिश्रम घेतले त्याप्रसंगी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी पत्रकाराच्या पत्रकार भवनाचा प्रलंबित प्रश्न सोडतांना सदर गाळा पत्रकार भवना साठी देऊन निकाली काढल्या बद्द्ल त्यांचे ही पत्रकाराच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार गजानन हिवरे,अमृत कऱ्हाळे,सतीश टाकळकर,  सुशीलकुमार दळवी, शेख अफसर शेख सत्तार, शेख अनिस बाबूमियाँ,अच्युत जोगदंड, विजय बागाटे,केदार पाथरकर,आनंद ढोणे पाटील,विनायक देसाई, दौलत भोसले, सय्यद सलीम सुहागनकर,सुरेश मगरे, शेख वझीर,अच्युत जोगदंड,यादव, संपत तेली, संजय गव्हाणे म.अलीम, कैलास बळखंडे, अनिल अहिरे, जाकिर पठाण,सह आदी ग्रामीण भागाच्या पत्रकारांची यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड.संजय गव्हाणे यांनी मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या