🌟परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचा वाढदिवस रक्तदान शिबीराद्वारे साजरा...!


🌟पोलिस दलातील अधिकारी कर्मचार्‍यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले🌟


परभणी (दि.०८ ऑगस्ट २०२४) :- परभणी जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज गुरुवार दि.०८ ऑगस्ट रोजी पोलिस दलातील अधिकारी कर्मचार्‍यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

           जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या सह्याद्री मंगल कार्यालयात आज गुरुवारी आयोजित या रक्तदान शिबीरात पोलिस अधिक्षक सन्माननीय रविंद्रसिंह परदेशी त्यांच्या सुविद्य पत्नी व मुलगा विक्रांत यांच्यासह अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे,गंगाखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.दिलीप टिप्परसे, तसेच मुख्यालयातील कर्मचारी व विविध ठाण्यातील अंमलदार असे एकूण ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

            यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश लखमावार यांच्यासह त्यांचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, पोलिस मुख्यालयाच्या परिसरात या वाढदिवसाच्या निमित्ताने वटवृक्ष, पिंपळ, आम्रवृक्ष, जांभूळ, आवळा, आपटा आदींची रोपटे लावून बगीचा फूलविण्याचा संकल्पही सोडण्यात आला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या