🌟सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास यशवदे यांचा संजय गांधी आश्रमशाळेत सत्कार....!


🌟कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था प्रतिनिधी सिद्धांतजी राजकुमार सावंत यांच्या हस्ते शाल,पुष्पहार व सन्मानपत्र देऊन सत्कार🌟    

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत संजय गांधी आश्रमशाळेचा विद्यार्थी कैलास प्रयागबाई कचरोबा यशवदे याची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यामुळे संजय गांधी आश्रमशाळा गंगाखेड येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था प्रतिनिधी श्री. सिद्धांतजी राजकुमार सावंत यांच्या हस्ते शाल, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक कैलास यशवदे यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे श्री. उमेश तुपे सर, श्री. भगवान लिंबुरे आणि श्री. राजेश निळे हे होते. सत्काराला उत्तर देताना कैलास यशवदे यांनी कठोर परिश्रमाला पर्याय नाही कष्टाने हवे ते यश संपादन करता येते असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. तुपे सर यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. शांतिभूषण साळवे सर यांनी केले. कार्यक्रमालाजेष्ठ शिक्षक श्री एल के कचरे व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. संस्था अध्यक्ष मा श्री राजकुमार सावंत यांनी मुलांचे कौतुक करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या