🌟परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण🌟
परभणी (दि.०१ ऑगस्ट २०२४) :- परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी स्वखर्चातुन आणलेल्या क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे आज गुरुवार दि.०१ ऑगस्ट रोजी शहरातील लहुजी नगरात आमदार डॉ.राहूल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
परभणी शहरात साळवे यांचा सर्वप्रथम पुतळा लहुजी नगरात तत्कालीन माजी खासदार, तत्कालीन नगराध्यक्ष शेषराव देशमुख यांच्या कार्यकाळात उभारण्यात आला होता. परंतु ते शिल्प जिर्ण झाल्यामुळे त्या जागी पंचधातुची क्रांतीवीर लहुजी साळवे यांची मुर्ती उभारावी अशी मागणी आ.डॉ.पाटील यांच्याकडे समाज बांधवांनी केली होती. आ.डॉ. पाटील यांनी तात्काळ ही मागणी मान्य करून २५ लाख रूपये खर्च करून फक्त ६ महिन्यात ३५० किलो वजनाची पंचधातुची पुर्णाकृती मुर्ती पुणे येथील प्रसिध्द मुर्तीकार श्री मंगेश कुरडूकर यांच्याकडून तयार करून घेतली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त ०१ ऑगस्ट रोजी लहुजी नगर येथे या मुर्तीचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
या वेळी आ.डॉ. पाटील, काँग्रेस नेते सिध्दार्थ हत्तीअंबीरे, डॉ. विवेक नावंदर,संजय गाडगे, अरविंद देशमुख, आकाश लहाने, प्रदिप वावळे, अमोल गायकवाड, गौतम भराडे, मुर्तीकार मंगेश कुर्डेकर, लालसेनेचे कॉम्रेड गणपत भिसे, कचरू आगळे, के. के. भारसाकळे, जयंती समितीचे अध्यक्ष कार्तिक साळवे, पप्पु वाघमारे, हेमंत साळवे, अजय वाघमारे, दिपक साळवे, संजय लोखंडे, संजय शिंदे, अशोक शिंदे, बायजाबाई घोडे, अविनाश मोरे, अशोक उबाळे, किशोर कांबळे, उत्तम गोरे, विकास गोरे, दिलीप कांबळे, माधव बिंडे, आदिंची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राहुल वहिवाळ, प्रास्ताविक पुतळा समितीचे संयोजक माऊली साळवे तर आभार गणपत भिसे यांनी मानले. या प्रसंगी सर्व समाजाच्या वतिने आ. डॉ. पाटील यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.
0 टिप्पण्या