🌟परभणी शहरातील खानापूर येथे संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न....!


 🌟 रक्तदान शिबिरात 81 रक्तदात्यांनी केले रक्तदान🌟


परभणी (दि.01आॕगस्ट 2024) : परभणी शहरातील खानापूर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबीराचे उद्दघाटन मराठा बटालियनचे माजी सैनिक मंचकराव शिंदे व तुकारामजी मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माऊली मोहिते, बळीराम मोहिते,डाॕ.निलेश दळवे ,माजी नगरसेवक राजू शिंदे , तुकारामजी शिंदे,वशिष्ठ शिंदे,रामकिशन यादव आदी उपस्थित होते. 

      यावेळी तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या शिबीरात विविध जाती धर्माच्या रक्तदात्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून रक्तदान केले. यात एकून 81 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शासकीय रक्तपेढी , परभणी यांनी रक्त संकलन केले प्रसंगी शिबीरास प्राचार्य नितीन लोहट, व्याख्याते प्रा. सुभाष ढगे, सुधाकर गायकवाड, चेअरमन प्रसाद गरूड , ज्ञानेश्वर खटींग, संतोष शिंदे आदीनी भेट दिली. 

   शिबीराच्या यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिग्रेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, माऊली काळे, आमोल मोहिते, गोरख मोहिते, सुबोध काळे, विशाल सुर्यवंशी , कनैय्या शिंदे , वैभव शिंदे , पप्पू मोहिते , राहुल शिंदे,वसंत शिंदे , हरी शिंदे, किरण शिंदे, अमोल शिंदे, गणेश मोहिते, विशाल शिंदे, स्वप्नील गोरे , तेजस मोहिते आदीनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या