🌟पुर्णा तालुक्यातील गौर जिल्हा परिषद सर्कल मधील देवस्थानांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास होणार तरी केव्हा ?


🌟अविकसित रस्त्यांमुळे जागृत देवस्थानांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोसाव्या लागतात अक्षरशः मरन यातना🌟


✍🏻परखड सत्य :- चौधरी दिनेश (रणजित)

विकासाच्या नावावर शासकीय तिजोरीची अक्षरशः लुटालूट.... भ्रष्ट बेईमान नौकरशहांकडून जनसामान्यांचे आर्थिक मानसिक शोषण बेछूट....रोजमजूर कामगारांच्या झोळीत शासकीय किडक राशन मुठ दोन मुठ......संधीसाधू भ्रष्ट लोकप्रतिनिधींधीची विकासा संदर्भात निवडणूक काळात आश्वासन बेछूट‌....एकंदर अशी अवस्था पुर्णा तालुक्यात सर्वत्र झाल्याचे पाहावयास मिळत असून पुर्णा-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील धार्मिक तिर्थक्षेत्रांना चुडावा येथील परमपूज्य श्री महंत १००८ जिवनदासजी महाराज यांच्या पवित्र मठाने सुरुवात होते तर याच राष्ट्रीय महामार्गावरील गौर जिल्हा परिषद सर्कलमध्ये जवळपास चार ते पाच जागृत देवस्थान असून यातील लिखा पिंपळगाव येथील तिर्थक्षेत्र श्री गंगाजीबापू देवस्थानाच्या दर्शनासाठी प्रत्येक महिन्यातील अमावास्याला लाखों भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे हे देवस्थान धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपाला आले आहे तर याच गौर जिल्हा परिषद सर्कलमधील गौर गावात अत्यंत जागृत असे हेमाडपंथी श्री सोमेश्वर महादेव देवस्थान असून देवस्थानाच्या परिसरात सर्वात पुरातन हेमाडपंथी बारव असून या देवस्थानाची तालुक्यात प्रती औंढा नागनाथ अशी ओळख असून महाशिवरात्रीला भव्य पालखी मिरवणूक सोहळा तर प्रतिवर्षी एप्रिल महिन्यात या देवस्थान परिसरात आमली बारसेला भव्य जत्रा भरत असते या जत्रेला परिसरातील राज्यासह परराज्यात स्थानिक झालेल्या लोकांसह या गावातील लेकीबाळी एखाद्या सन उत्सवाप्रमाणे गौर गावात आवर्जून येतात तर याच गौर जिल्हा परिषद सर्कलमधील कंठेश्वर येथील पुर्णा-गोदावरी संगमावर हेमाडपंथी श्री कोटेश्वर महादेव देवस्थान असून अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कोटेश्वर महादेव मंदिरात भव्य अशे दोन शिवलिंग असून येथील पुर्णा-गोदावरी नदीच्या पवित्र संगमावर वनवास काळात प्रभु श्रीरामचंद्र माता सिता आणि लक्ष्मण यांनी पवित्र गंगास्नान करून शिवलिंगाचा अभिषेक केल्याची नोंद आजही ब्राह्मपुराण या धार्मिक ग्रंथात आहे अश्या या पवित्र तिर्थक्षेत्र असलेल्या कोटेश्वर महादेव देवस्थान येथे प्रतिवर्षी महशिवरात्रीला भव्य अशी जत्रा भरते सदरील जत्रा तीन दिवस चालत असते यावेळी लाखों भाविक या ठिकाणी गंगास्नानासह श्री कोटेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात तर याच गौर जिल्हा परिषद सर्कलमधील धनगर टाकळी येथे श्री दाजीगुरू महाराज यांचे पवित्र देवस्थान आहे.


(पुर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथील श्री कोटेश्वर महादेव देवस्थानाला जाणारा मार्ग

याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे याच नांदेड-पुर्णा राष्ट्रीय महामार्गाला जोडलेल्या पुर्णा-अजदापूर-कंठेश्वर-सातेगाव-सारंगी हा लोहा व पालम या दोन तालुक्यांना जोडणारा मार्ग असून या मार्गावर पवित्र गोदावरी काठावर तिर्थक्षेत्र श्री भोगावं मारुती हे जागृत देवस्थान असून या तिर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी प्रत्येक शनिवारी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात परंतु या जागृत देवस्थानांसह या देवस्थानावर दर्शनासाठी येणाऱ्या धार्मिक पर्यटक अर्थात भाविकभक्तांचे दुर्दैवच म्हणावे लागेल की या पवित्र तिर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या कोणत्याही रस्त्यांसह परिसराचा अद्यापही विकास झालेला नसल्याने या जागृत देवस्थानांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अक्षरशः मरन यातना सोसाव्या लागतात  गौर जिल्हा परिषद सर्कलमधील या जागृत व पवित्र तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह परिसरातून निवडून येणारे स्थानिक निष्क्रिय लोकप्रतिनिधी व प्रशासनही उदासीन असल्याने या परिसरातील नागरिकांना देखील या उदासीन धोरणाचा जोरदार फटका बसत असल्याचे निदर्शनास येत आहे.....

(पुर्णा तालुक्यातील लिखा पिंपळगाव येथील पवित्र तिर्थक्षेत्र श्री गंगाजीबापू देवस्थानाला जाणारा मार्ग...)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या