🌟रेल्वे उड्डाणपूल गुत्तेदारासह रेल्वे प्रशासनाचा अकार्यक्षम यमदूती कारभार थांबणार तरी केव्हा ?🌟
🌟 नांदेड-हिगोली गेट परिसरातील निर्मानाधिन रेल्वे उड्डाण पुलालगतच्या पर्यायी मार्गावर कागदोपत्री कोट्यावधीचा खर्च🌟
✍🏻मुक्काम पोस्ट पुर्णा जंक्शन :- चौधरी दिनेश (रणजित)
पुर्णा (दि.०८ ऑगस्ट २०२४) :- पुर्णा-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील हिंगोली गेट परिसरात महारेल (एमआयडीसी) अंतर्गत तब्बल ९६ कोटी ६६ लाख ५५ हजार ७५७ रुपयांच्या विकास निधीतून मागील पाच वर्षांपूर्वी दि.२७ ऑगस्ट २०१९ यावर्षी रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामाला गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा.ली.या बांधकाम गुत्तेदार कंपनीने सुरूवात केली एकीकडे सदरील उड्डाणपूलाच्या अर्धवट बांधकाचा पाचवा वर्धापनदिन सोहळा जिल्ह्यातील जनमतातून निवडून आलेल्या तथाकथित कर्तृत्ववान कार्यसम्राट लोकप्रतिनिधींच्या साक्षीने दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी जल्लोषात साजरा करण्याची वेळ तमाम पुर्णेकरांवर आली असली तरी दुसरीकडे मात्र या अर्धवट निकृष्ट उड्डाणपूलासह या परिसरातील प्रयायी मृत्यू मार्गामुळे मात्र शहरी भागासह ग्रामीण भागातील अनेक वाहनधारकांवर अक्षरशः स्वतःच्या पिंडदानाला काकस्पर्श करुन घेण्याची वेळ रेल्वे उड्डाणपूल गुत्तेदार कंपनी गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा.ली यांच्यासह रेल्वे प्रशासनाच्या अकार्यक्षम यमदूती कारभारामुळे आली असल्याचे निदर्शनास येत आहे.
पुर्णा-नांदेड लोहमार्गावरील नांदेड-हिगोली गेट परिसरातील निर्मानाधिन रेल्वे उड्डाण पुलालगतचा पर्यायी मार्गाच्या दुरुस्तीवर एमआरआयडीसी महारेलने कोट्यावधी रुपयांचा खर्च करुनही सदरील पर्यायी मार्गाची दयना संपता संपत नसल्याने या मार्गाचे रुपांतर अक्षरशः मृत्यू मार्गात रुपांतर झाले असून पावसाळा सुरू असल्यामुळे या मार्गावरून आतापर्यंत जवळपास शंभर सव्वाशे दुचाकी चालक घसरुन गंभीर जखमी झाले तर गौर येथील एका युवकाला आपला प्राणही गमवावा लागला तरी देखील संबंधित गुत्तेदार कंपनीसह रेल्वे प्रशासनाच्या अकार्यक्षम यमदूती कारभारात सुधारणा झाली नाही ही अत्यंत गंभीर व दुर्दैवी बाब म्हणावी लागेल सदरील निर्माणाधीन रेल्वे उड्डाणपूलामुळे या पुर्णा-नांदेड राष्ट्रीय महामार्गाला मागील पाच वर्षांपासून लागलेला साडेसातीचा पर्वकाळ संपता संपत नसून मागील सन २७ ऑगस्ट २०१९ मध्ये सुरु झालेल्या या रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला येत्या दि.२७ आगष्ट २०२४ रोजी पाच वर्षाचा कालावधी पुर्ण होत असून सदरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम अजूनही अर्धवटच असल्यामुळे या राष्ट्रीय मार्गावरील वाहतुक अक्षरशः मागील पाच वर्षांपासून सातत्याने विस्कळीत होतांना दिसत आहे.
पुर्णा-नांदेड राष्ट्रीय महामार्ग जवळपास लगतच्या तीन जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग असतांना देखील या मार्गावरील हिंगोली परिसरातील संधथगतीने बांधकाम सुरू असलेला निर्माणाधीन अर्धवट व निकृष्ट रेल्वे उड्डाणपूल सातत्याने धोक्याची घंटा देताना पाहावयास मिळत आहे या रेल्वे उड्डाणपूला लगतचा रहदारीचा पर्यायी रस्ता अर्धवट व निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे अल्पकालावधीतच अदृश्य झाल्याने हा पर्याय मार्ग वाहन धारक प्रवासी वर्गासाठी धोकादायक झाला सदरील रस्त्याचे काम महारेल (एमआरआयडीसी) कडून सब गुत्तेदार शेख अतिख यांना देण्यात आले या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाल्यामुळे रस्त्याला अवघ्या दिड महिन्याच्या काळात मोठमोठे तडे गेले व रस्ता मात्र अपुर्णच झाला रस्त्याच्या सुरुवातीला लोखंडी रॉड मोकळे झाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी वाहनांना अडकून मोठा अपघात होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जात आहे कोट्यावधी रुपये खर्चूनही रस्त्याचे काम अधांतरीतच राहिले त्यामुळे पावसाळा सुरू झाल्याने हा रस्ता वाहन चालकासाठी अक्षरशः मृत्यू मार्गच होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा रस्ता २६० मिटर असून या पैकी ५० टक्के रस्ता देखील पुर्ण झालेला नसून लाखों रुपयांच्या या रस्त्यांची धुळधान झाल्याचे दिसत आहे त्यामुळे महारेलच्या शासकीय विकास निधीची संबंधित गुत्तेदाराने अक्षरशः वाट लावल्याचे दिसत दिसत आहे.
या उड्डाण पुलाजवळचा पर्यायी रस्ता उडान पुलाच्या दोन्ही बाजूने २६० मिटर असून या रोडचे अंदाजीत किंमत २५ ते ३० लाख रुपये असल्याचे एमआरआयडीसी चे तत्कालीन कनिष्ठ अभियंता भूषण गिरी यांनी मागील वर्षी सांगितले होते म्हणणे आहे सदरील रस्ता संबंधित सब गुत्तेदाराने केवळ १०८ मिटर रस्ता बनवला होता तोही अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवण्यात आल्यामुळे अल्पशा कालावधीमध्ये तो रस्ता देखील अक्षरशा हम अदृश्य झाला त्यामुळे महारेल एमआरआयडीसीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने हा रस्ता वाहन चालकांसह या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणाऱ्या प्रवाशांसाठी मृत्यू मार्ग होत असल्याने भविष्यात फार मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही...
0 टिप्पण्या