🌟पुरस्कारासाठी अर्ज करणारा अर्जदार महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्यास असावा🌟
परभणी (दि.02 ऑगस्ट 2024) :- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे अंतर्गत परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने सन 2023-24 या वर्षासाठी जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत. याकरिता गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत असून 44 क्रीडा प्रकारांतून या पुरस्कारांची निवड होणार आहे.
पुरस्कारासाठी अर्ज करणारा अर्जदार महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्यास असावा. त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत, महाराष्ट्रामध्ये सतत 10 वर्षे क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य केलेले असावे. गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी (1 महिला, 1 पुरुष व 1 दिव्यांग खेळाडू) अर्ज करणाऱ्या खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपुर्व 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व केलेले पाहिजे, संघटना, शालेय व केंद्र शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धामधील कामगिरीचा विचार होणार आहे. पुरस्काराकरिता इच्छुकांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज दि. 08 ऑगस्ट 2024 पर्यंत सुटीचे दिवस वगळून सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, स्टेशन रोड, परभणी येथे सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी श्री. संजय मुंढे, राज्य क्रीडा मार्गदर्शक (9422178009) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या