🌟पुर्णेतील सिद्धार्थ नगर येथील रहिवासी मालताबाई भिमराव दुधडे गौरकर यांचे दुःखद निधन.....!


🌟त्यांचा अंत्यविधी पूज्य भदंत पय्यावंश यांच्या हस्ते पूर्णा स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात करण्यात🌟

पुर्णा :- पुर्णा शहरातील सिद्धार्थ नगर येथील रहिवासी असलेल्या सौ मालताबाई डॉ.भीमराव दुथडे यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे दुःखद निधन झाले. छत्रपती संभाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय  येथील प्राध्यापक सचिन गौरकर यांच्या त्या मातोश्री आहेत तर शासकीय निमशासकीय लिपिक हक्क परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजू रणवीर यांच्या त्या विहीन बाई होत्या.

त्यांचा अंत्यविधी पूज्य भदंत पय्यावंश यांच्या हस्ते पूर्णा स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आला,त्यांना दोन मुले, मुली, पती, सून, नात, असा मोठा परिवार आहे. अंत्यविधीस पूर्ण परिवार पूर्णा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या