🌟राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत 'तंबाखुमुक्तीचा जागर'....!


🌟 यावेळी डॉ.आदित्य पांढारकर यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू जन्य अंमली पदार्थामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणामाची माहिती दिली🌟

फुलचंद भगत

वाशिम :- जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत दिनांक २/०८/ २०२४ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली ओम् नमः शिवाय विश्व प्राथ आदिवासी आश्रमशाळा.केनवड ता.रिसोड येथे शालेय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ.आदित्य पांढारकर यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू जन्य अंमली पदार्थामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम तसेच मुख कर्करोग व त्याची प्राथमिक लक्षणे व  त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना.सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे  यांनी तंबाखू मुक्त शाळा व तंबाखू जन्य पदार्थ  नियंत्रण कायदा कोटपा २००३ मानस शास्त्रज्ञ.राम सरकटे यांनी व्यसनाची तीव्रता तसेच व्यसन सोडविण्यासाठी असलेल्या उपाय योजना व समुपदेशन या बाबत  शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रभारी श्री.गोळे यांनी तंबाखू मुक्त व व्यसन मुक्त समाज  घडविणे हा प्रत्येकाचा सामाजिक उदांत हेतू असला पाहिजे असे मत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या