🌟वादग्रस्त रामगिरी महाराज यांच्यावर देशद्रोह व मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा......!


🌟पुर्णा तालुका जमियत उलमाची निवेदनाद्वारे मागणी🌟 

पुर्णा :- दोन धर्मीयांमध्ये जाणूनबुजून जातीय तेढ निर्माण करून धार्मिक कलह, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी रामगिरी गुरू नारायण गिरी महाराज, सरला बेट ता. वैजापूर यांच्यावर देशद्रोहाचा व मोक्का कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करणे व त्याला प्रोत्साहन व पाठींबा देणारे सर्वांवर कायदेशीर कार्यवाही करावा असे मागणीचे निवेदन जमियत उलमा पूर्णा यांच्यावतीने पूर्णा पोलिसांमार्फत देशाचे राष्ट्रपती यांना देण्यात आला आहे.

            नाशिक जिल्ह्यातील मौजे पंचाळे, ता. सिन्नर या ठिकाणी सप्ताहा दरम्यान प्रवचन करतांना रामगिरी गुरू नारायण गिरी महाराज यांनी उपस्थित जनसमुदाया समोर मुस्लिम धर्मगुरू व धर्माची प्रतिमा मलीन होईल, असे जाणीवपूर्वक प्रवचन केले आहे.भारतात एक कोटींपेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे. दहा-वीस वर्षे ज्यांनी मौलाना म्हणून काम केले आहे. त्यांनी इस्लामाचा धर्म सोडून दिला आहे. मोहम्मद पैगंबर यांचे आदर्शच अत्याचारी आहेत, त्यांच्या बाबत अजून काय सांगायचे ? अशा स्वरूपात त्या प्रवचना मध्ये मुस्लिम धर्मीयांबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्य रामगिरी महाराज सरला बेट, ता. वैजापूर जि. औरंगाबाद यांनी केली आहेत. या वक्तव्यामुळे व अशा प्रकारच्या प्रवाचनामुळे हिंदू-मुस्लिम या दोन समाजा मध्ये मने कलुषित करून जातीय तणाव, धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहे.म्हणून वरील आरोपीने मुस्लिम धर्माबद्दल व त्यांच्या पैगंबर, धर्मगुरू बद्दल ज्या प्रकारे प्रक्षेपण भाषण व खोटी माहिती पसरवून अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे. अशा आरोपी विरुद्ध वेळेतच कार्यवाही होणे अपेक्षित असताना संबंधित पोलीस स्टेशनला आदेश देऊन गुन्हा नोंदवून आरोपीस जेरबंद करून कार्यवाही करावी. अशा मागणीचे निवेदन जमियत उलमा पूर्णा चे शेख जावेद शेख मन्नान, मुफ्ती बिलाल रहेमानी, अब्दुल मातीन खरेशी, शेख इम्रानोद्दीन, शेख समीर, मुफ्ती, मुफ्ती अतिक आदी ने स्वाक्षरी करून पूर्णा पोलीस ठाण्यात दिले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या