🌟शिवसेना नेते खासदार रविंद्र वायकर हे देवगिरी एक्सप्रेसने मुंबईहून सकाळी परभणीत दाखल होणार🌟
परभणी (दि.२० ऑगस्ट) : राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे) गटाचे नेते खासदार रविंद्र वायकर हे उद्या बुधवार दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी परभणी व गंगाखेड या दोन मतदारसंघाच्या दौर्यावर येणार आहेत.
खासदार वायकर हे देवगिरी एक्सप्रेसने मुंबईहून सकाळी परभणीत दाखल होणार असून ते भास्करराव लंगोटे व राजू कापसे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देवून दुपारी मथूरा नगरातील सिमेंट रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी खासदार अॅड.सुरेश जाधव यांच्या निवासस्थानी भेट देवून ते दुपारी सावली या शासकीय विश्रामगृहावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार आहेत. उपजिल्हाप्रमुख माणिकराव पोंढे यांच्या कार्यक्रमास उपस्थिती लावून ते गुरुवारी पालम या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीस व मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी खासदार अॅड. सुरेश जाधव यांनी दिली......
0 टिप्पण्या