🌟भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालयाच्या सचिवांना निवेदन🌟
परभणी :- परभणी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यास प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सपशेल निष्क्रिय ठरले असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निवेदन भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीचे मराठवाडा विभाग प्रमुख सुनील मुलगीच यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालयाच्या सचिवांसह महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभाग पुणे येथील आयुक्त,जिल्हाधिकारी परभणी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना दिले आहे.
भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद मागण्या करण्यात आले आहे की जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हप्त्यातून दोन दिवस दिव्यांग व्यक्तींच्या काय समस्या आहेत ह्या जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना वेळ देणे बंधनकारक असतांना सुद्धा प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे दिव्यांगाच्या समस्या जाणून घ्यायला वेळ नाही खाजगी दिव्यांग कार्यशाळेचा मामू नावाचा कर्मचारी हा समस्या सोडविण्यासाठी नव्हे तर केवळ कमिशन गोळा करण्यासाठी ठेवला आहे की काय ? प्रभारी समाज कल्याण अधिकारी हे ऑफिसमध्ये येतात आणि हजेरी लावून निघून जातात त्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रभारी समाज कल्याण अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही.
समाज कल्याण ऑफिस मध्ये दिव्यांग विभागाचे प्रमुख श्री प्रल्हाद लांडे यांच्याकडून दिव्यांगांबाबतीत विविध योजना राबवणे बंधनकारक असताना हे तसं न करता दिव्यांग शाळेचे कर्मचारी घेऊन नेहमी बसलेले असतात. दिव्यांग व्यक्ती ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन न करता सातत्याने उडवा उडडीची उत्तर देऊन दिव्यांगाची दिशाभूल करतांना पाहावयास मिळतात.
सन २०२४/२५ या चालू वर्षाचा दिव्यांगाचा राखीव पाच टक्के निधी खर्च करणे बंधनकारक असताना सुद्धा प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडून जाणून बुजून दिव्यांगाचा ५% निधी यावर्षी खर्च करण्यात आलेला नाही ? यामुळे दिव्यांगाच्या शासकीय योजनांमध्ये होणारी दप्तर दिरंगाई तात्काळ थांबवण्याय यावी तरी तात्काळ नमूद मागण्या निकाली काढण्यात याव्या आणि आपण आम्ही दिलेल्या निवेदनावर काय कारवाई केली या संदर्भात भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीला लेखी पत्राद्वारे कळवावे असेही निवेदनात म्हटले असून या निवेदनावर सुनील मुलगीर यांच्यासह बाळासाहेब घाटूळ, सय्यद आयास गजानन गरुड, रामा खापरे, रामा नालेगावकर, नामदेव गिराम, भगवान मुलगीर, जानकीराम लांडे, संदीप थोरात, प्रसाद पवार, सर्जेराव काळे, जगन्नाथ ठुले, चंपत मामा कदम, दत्ता शिंदे, अशोक डाके, शिला आव्हाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत........
0 टिप्पण्या