🌟अजबनगर येथील भागवत सप्ताहात भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती🌟
✍️ मोहन चौकेकर
छत्रपती संभाजीनगर :- प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी देखील सध्या अजबनगर येथे चालू असलेल्या श्रीमद् भागवत कथेत आज ह भ प उद्धव महाराज टाकसाळ यांनी भगवंताच्या नामाचे महत्त्व पटवून सांगितले. भक्त प्रल्हादावर अनेक संकटे आली,त्यांना कडेलोट केला, तापलेल्या तेलात बुडवले , हत्तीच्या पायाखाली तुडवले, पण भगवंतांने भक्त प्रल्हादाचे रक्षण केले, कारण भक्त प्रल्हाद सतत भगवंताचे "नारायण, नारायण" असे नामस्मरण करत होते. कलियुगात आपल्याला ही मोक्ष प्राप्ती हवी असेल तर भगवंताचे नामस्मरण करा असे आवाहन केले. गजेंद्रमोक्ष, वामन अवतार इत्यादी कथा अगदी सोप्या भाषेत श्रोत्यांना सांगितल्या व शेवटी श्रीकृष्ण जन्मकथा सांगून आजच्या कथेचा समारोप केला. दी. २३ ऑगेस्ट रोजी काल्याच्या कीर्तनाने या भागवत कथेची सांगता होणार आहे.
अखंडित २७ वर्षापासून संयोजक शिवसेनेचे विभागीय नेते राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शन खाली "श्रीमद भागवत सप्ताह" सुरू असून यावेळी या भागातील श्रोत्याची संख्या व उत्साह बघण्यासारखा होता. शनिवार दि १७ ऑगस्ट पासून हा सप्ताह सुरू असून दररोज साय- ६:००ते ९:०० यावेळेत ह भ प उद्धव महाराज टाकसाळ यांच्या वाणीतून सुंदर अश्या कथा ऐकण्यास मिळत आहे, या कथेला आज ह भ प नवनाथ महाराज आधळे, सप्ताह समितीचे राजेंद्र दानवे, दादाराव पवार, देविदास जाधव, हरिभाऊ गायकवाड, वैभव जाधव, महेश गायकवाड,अशोक गायकवाड, रुस्तम राठोड ज्ञानेश्वर हिंगे , अंकुश इंदापुरे , शेखर पवार आदी उपस्थित होते.
आजच्या आरतीचे यजमान श्री व सौ. बाळासाहेब दानवे , श्री व सौ महेश गायकवाड, श्री व सौ रोहित कुलकर्णी, श्री व सौ संदीप हिंगे, श्री व सौ शाम कुदळे, श्री व सौ श्रीनिवास पवार हे होते आरतीचे पौराहित्य विश्वास नागपूरकर गुरुजी, भूषण कुलकर्णी यांनी केले....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या