🌟परभणी जिल्ह्यातील मतदारांना नावनोंदणी करण्याची सुवर्णसंधी - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟त्यामुळे मतदारांनी जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन नावनोंदणी करून घेण्याचे आवाहन🌟

परभणी (दि.09 ऑगस्ट 2024) : आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, मतदान प्रारुप यादी प्रसिद्ध झाली असून, 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकास वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या, नवविवाहीत मतदारांना मतदार नावनोंदणी करण्याची सुवर्णसंधी येत्या शनिवार व रविवारी मिळणार आहे. त्यामुळे मतदारांनी जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन नावनोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवती तसेच नवविवाहितांना जवळच्या मतदान केद्रांवर जावून आपले नाव नोंदविता येणार असून, जिल्ह्यात 10 व 11 ऑगस्ट 2024 रोजी विशेष नावनोंदणी शिबिरामध्ये सहभागी होऊन मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.   

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लक्षात घेता दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांक आधारित मतदार याद्याच्या दुस-या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन दिनांक 10 व 11 तसेच 17 व 18 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आले आहे. या कालावधीत सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्र स्तरीय अधिका-यांकडून कार्यालयीन वेळेत बसून मतदाराची नोंदणी करून घेणार आहेत.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या