🌟योगाचार्य दिलीप पिडीयार यांनी राष्ट्रीय योगवीर पुरस्कार पटकावुन बुलढाणा जिल्ह्याच्या नाव लौकीकात घातली भर🌟
✍️ मोहन चौकेकर
चिखली : अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ आयोजीत योग महाकुंभ 2024 अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता, या योग महाकुंभमधे बुलढाणा जिल्ह्यातिल चिखली तालुक्यातील मंगरुळ नवघरे येथील रहवासी जिल्हा परिषद शाळा बोरगाव काकडे येथे प्राथमिक शिक्षक असलेले योगाचार्य दिलीप पिडीयार सर यांना योग क्षेत्र मधे उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल त्यांची राष्ट्रीय योगवीर पुरस्कार साठी निवड झाली आहे हा पुरस्कार त्यांना पद्मश्री अगुस इंद्र उदयन , शौर्य चक्र पुरस्कृत मधुसूदनजी सुर्वे ,अ.भा.योग.म राष्ट्रीय अध्यक्ष मंगेशजी त्रिवेदी व इतर मान्यवरच्या हस्ते देण्यात आला.योगाचार्य दिलीप पिडीयार सरांनी या आधी ही राष्ट्रीय योगासन स्पर्धे मधे भारतातून द्वितीय क्रमांक पटकावून रजत पदक आपल्या नावे केले होते व बुलढाणा जिल्हाच्या नाव लौकिकात भर घातली होती.
योगाचार्य दिलीप पिडियार सर मागिल 15 वर्षा पासून गावागावात जावून विद्यार्थ्यांना व नागरिकांना निशुल्क योग आरोग्य सेवा देत आहे व समजाला योगाचे महत्व पटवून देवून निरोगी ठेवत आहे त्यांनी आधी सुद्धा विविध योग संघटनच्या माध्यामातून योग व्रती सेवा दिली आहे व अनेकोनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त केले आहे या सर्वांची दखल घेत अखिल भारतीय योग महासंघचा राष्ट्रीय योग वीर पुरस्कार जाहिर झाला आहे या उपलब्धिमुळे त्यांचे सर्वच स्तरावरुण त्यांचे कौतूक होत आहे.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या