🌟मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतच्या अनियमीतते संदर्भात कारवाईच्या मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा....!


🌟पंचायत समितीचे मा.सभापती तथा विद्यमान सदस्य बंडू वैद्य यांनी स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषदे समोर आत्मदहनाचा दिला इशारा🌟 

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील मौजे पेडगाव येथील ग्रामसेवक आर.बी.हरणे यांचे पेडगाव ग्रामपंचायत मधील अनियमित आणि प्रलंबीत कारभाराची चौकशी करण्याकरिता दि.13 मार्च रोजी तक्रार केली त्या तक्रारीनुसार गटविकास अधिकारी पंचायत समिती मंगरुळपिर यांनी विस्तार अधिकारी पंचायत यांना आदेशीत केले त्यानुसार विस्तार अधिकारी पंचायत यांनी चौकशी करून ग्रामसेवक आर.बी. हरणे हे दोषी असून कारवाईस पात्र असल्याचा अहवाल गटविकास अधिकारी यांना दि. 20 मार्च च्या चौकशीच्या अनुषंगाने दिला परंतु तो अहवाल गटविकास अधिकारी मंगरुळपीर यांनी तो अहवाल राजकीय दबावाखाली दाबून ठेवून ग्रामसेवक यांचेवर कारवाई करण्याचा प्रस्ताव 4 महिने उलटूनही जिल्हा प्रशासनास पाठविण्यास हेतुपरस्पर टाळाटाळ करीत आहेत.

असा आरोप करत त्वरीत याप्रकरणी कारवाई न झाल्यास दि.१५ ऑगष्ट स्वातंञ्यदिनी आत्मदहनाचा लेखी इशारा पं.स.सदस्य माजी.पं.स.सभापती,माजी सेना ऊपतालुकाप्रमुख बंडुभाऊ वैद्य यांनी प्रशासनाला दिला आहे पेडगाव ग्रां.पं.च्या अनियमिततेविषयी चौकशीसाठी याआधी तक्रार दिली होती.तक्रारकर्त्याने वारंवार सबंधित अधिकारी यांना भेटून कारवाईचा प्रस्ताव पाठवण्याची विनंती करून काही उपयोग झाला नाही त्यामुळे दि.10 जुलै रोजी मुख्य अधिकारी यांचेकडे पत्र देऊन कारवाईची मागणी केली.त्यानुसार पत्रानुसार सदर तक्रारीची सुनावणी दि. 18 जुलै रोजी घेऊन ग्रामसेवक आर. बी हरणे यांना 30 दिवसात प्रलंबीत सर्व विषय आणि कामकाजात सुधारणा करण्याची शेवटची संधी

पंचायत समीतीस मंगरुळपीर दिली होती.सदर ग्रामसेवक यांनी सुधारणा न केल्यास त्यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेशीत केले होते.15 वित्त आयोगाच्या पंचायत समिती स्तरावरील कामाचे देयकाची रक्कम ग्रामपंचायतच्या खात्यात जमा होऊन जवळपास 5 महिने होवून न दिल्याने सरपंच ग्रामपंचायत पेडगाव यांनी आपल्याला दि.08 जुलै रोजी पत्र देऊन व सिईओ यांना प्रत्यक्षात भेटून कळविले आहे त्यावेळी सदर कामाचे देयके दोन दिवसात अदा करण्यास संबंधित ग्रामसेवक यांना आदेशीत केलेले होते तसेच तक्रारीनुसार तक्रार निवारण दिवसी देखील त्वरित सदर कामाचे बिले देण्यासाठी तसेच ग्रामपंचायतची सर्व प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावण्याचे आदेशीत केले असतांना देखील सदर ग्रामसेवक हे हेतुपरस्पर जि.प.च्या आदेशाची अवहेलना करीत असुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याही आदेशाला न जुमानता त्याला केराची टोपली दाखविलेली आहे.यावरून संबंधित ग्रामसेवकाचा मुजोरपणा स्पष्ट दिसतो असे तक्रारीत नमुद आहे. त्याबाबत आज जवळपास 10 ते 20 दिवस उलटून ही ग्रामसेवकाचा मनमानी कारभार सुरूच आहे त्याबाबत तक्रारकर्ते दररोज गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन तसेच फोन करून त्यांना सांगितले परंतु त्यांनी सुद्धा त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही असे म्हटले आहे. गटविकास अधिकारी हे मुळात राजकिय दबावाखाली काम करीत आहे असाही आरोप करण्यात आला आहे.त्यामुळे संबंधित ग्रामसेवक यांचेवर 15 दिवसात दिलेल्या आदेशानुसार निलंबनासह बडतर्फीची कारवाई करावी.कारवाई न झाल्यास नाईलाजाने दि. 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषद वाशिम येथे आत्मदहन करण्याचा इशारा पं.स.सदस्य बंडुभाऊ वैद्द यांनी लेखी निवेदनाव्दारे सबंधित प्रशासनाला दिला आहे.

* ग्रामसेवकाच्या चौकशी व निलंबनाची केली होती मागणी :-

पेडगाव येथील ग्रामसेवक आर.बि. हरणे यांनी केलेल्या अनियमित व प्रलंबित कारभाराची चौकशी करून त्यांचेवर निलंबनाची कारवाई करावी.सर्कल मधील पेडगाव येथील ग्रामसेवक श्री. आर.बि. हरणे यांच्या ग्रामपंचायत मधील प्रलंबित असणाऱ्या सर्व कामांचे चौकशी करण्यात यावी. श्री हरणे यांनी कुठल्याही शासकीय कामामध्ये आणि त्यांच्या जबाबदारी व कर्तव्य यामध्ये फार मोठ्‌या प्रमाणात कसूर केलेला आहे. ग्रामपंचायतच्या कुठल्याही कामाचे नियोजन न करता अमलबजावणी करण्याबाबत देखील हेतुपुरस्पर दुर्लक्ष केलेले आहे. १५ वा वित्त आयोगाचा ग्रा.पं.स्तराचा संपूर्ण निधी खर्च करण्याबाबत ग्रामपंचायत ने ठराव मंजूर केला असताना सुद्धा संबंधित कामाचे अंदाजपत्रक बनवून अद्याप पर्यंत हि वरिष्ठ कार्यालयाला तांत्रिक मान्यतेसाठी सादर केले नाही. संपूर्ण निधी अखर्चित आहे संबंधित संचिव हे मुख्यालयी न राहता तालुका ठिकाणावरून ये-जा करतात. कर वसुली बाबत गावामध्ये कुठेही फिरताना दिसत नाहीत. त्यामुळे ग्रा.पं. ची कर वसुली फार मोठ्‌या प्रमाणात थकीत आहे. तांडा सुधार वस्ती योजनेंतर्गत मंजूर काम २०२० / २१ पासून प्रलंबित आहे. सदर कामाचा पहिला हप्ता १ वर्षापूर्वी जमा होऊन देखील सदर काम करण्यात कसूर केलेला आहे. कर वसुली बाबत कुठलीही कारवाई केलेली नाही. गावातील नागरिकांच्या रजिस्टर खरेदी विक्रीच्या व्यवहाराच्या नोंदी नमुना ८ ला घेणे आवश्यक असताना त्या नोंदी २-२ वर्षापासून प्रलंबित आहेत.अशी तक्रार पं.स सदस्य बंडुभाऊ वैद्द यांनी याआधी केली होती.

* चौकशीत ग्रामसेवक आढळले कसुरवार :-

सबंधित ग्रामसेवकाची विस्तार अधिकारी यांचेकडुन रितसर चौकशीही करण्यात आली होती.या चौकशीमध्ये विविध मुद्द्यामध्ये सबंधित ग्रामसेवक दोषी आढळले असल्याचेही नमुद आहे.तरीही त्या ग्रामसेवकावर कारवाई अद्यापपर्यत का करण्यात आली नाही असा प्रश्न सर्व जनतेस पडला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या