🌟स्वतःच्या रक्ताने रेखाटलेली पेंटिंग दिली भेट🌟
✍️ मोहन चौकेकर
बुलढाणा : नेत्यांसाठी अनेक कार्यकर्ते अनेक वेळा काही-काही करताना दिसतात. कुणी पायीवारी करते, कुणी चप्पल घालत नाही ते कोणी लोटांगण घालत जातात....! साधारणत: हे प्रकार निवडणूक जिंकून येण्यासाठी केलेले नवस असतात.
परंतु सध्या कोणतीही निवडणूक नसताना बुलढाण्यातील एका निष्ठावंत कार्यकर्त्याने आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजयभैया गायकवाड यांना वाढदिवसाच्या निमित्याने स्वतःच्या रक्ताने रेखाटलेली पेंटिंग भेट म्हणून दिली आहे.
पेंटिंग रेखाटण्यासाठी वापरलेले स्वतःचे रक्त. नेत्याशी असलेल्या एका कार्यकर्त्याच्या रक्ताच्या नात्याची संपुर्ण शहरात चर्चा आहे..! दिनांक- १५ ऑगस्ट २०२४ रोजी धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र युवानेते मृत्युंजयभैय्या गायकवाड यांच्या जन्मदिनाच्या निमित्याने त्यांच्या वाहनाचे सारथी ग्राम.सव येथील शंकर शेळके यांनी स्वतःच्या रक्ताने रेखाटलेली फोटो फ्रेम गिफ्ट केली.
सदर छायाचित्र रेखाटण्याचे कार्य बुलढाणा येथील टॅटू टेम्पलचे प्रो.प्रा.टिल्लू गोरले या कलाकाराने केले आहे..यावेळी त्या ठिकाणी शिवसेना,युवासेनेचे समस्त पदाधिकारी,मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या