🌟पुर्णेतील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिन साजरा...!



🌟प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांनी दोन्ही महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले🌟

पुर्णा (दि.०१ ऑगस्ट २०२४) :- पुर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात लोककवी, साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ  साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांनी दोन्ही महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

मराठी साहित्यातील एक अनमोल रत्न ज्यांनी महाराष्ट्राचे सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक वैभव जागतिक पातळीवर उजागर केले अशा थोर लेखकास व ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला  महाविद्यालयातील गृहविज्ञान विभाग प्रमुख तथा व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा डॉ सुरेखा भोसले, अधिसभा सदस्य प्रा डॉ विजय भोपाळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ भीमराव मानकरे, प्रसिद्धी विभाग समन्वयक प्रा डॉ संजय कसाब, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्रा.डॉ.प्रकाश सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा. डॉ.प्रभाकर किर्तनकार यांनी मानले या कार्यक्रमांसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या