🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिसांनी बेकायदेशीर कत्तलीसाठी जाणारी जनावरे घेतली ताब्यात....!


🌟ताडकळस पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत आयशरसह १८ जनावर घेतली ताब्यात🌟 

परभणी : परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिसांनी उखळद ते त्रिधारा पाटी या रस्त्यावरील घामोडी नाल्याजवळ मंगळवार दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजेच्या आयचर क्रमांक एम.एच ०४ डि.के. ३२८० मध्ये म्हैशीच्या वासरांना तसेच गोवंश जातीच्या जनावरांना अपुऱ्या जागेत निष्काळजीपणे व क्रूरपणे त्याना त्रास होइल अशा पद्धतीने वाहनात बांधुन त्यांना जखमी करुन त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने आरोपींच्याकडे जनावरांचा वाहतुकीचा परवाना नसताना घेवुन जात असतांना ताब्यात घेतली.

 सदरील अवैध विनापरवाना पशुधनाची वाहतूक करतानाची ताडकळस पोलिसांना माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि शिवकांत नागरगोजे, पोलीस अमलदार अतुल टेहरे,रामकिशन काळे, वऱ्हाडे यांच्या पथका मार्फत कारवाई करण्यात आली असून पोलीस अमलदार अतुल टेहरे यांच्या फिर्यादीवरून शेख मुखदर शेख समंदर वय ३५ वर्षे व्यवसाय चालक रा. खंडोबा बाजार परभणी,सय्यद मुन्ना सय्यद खदीर वय ३५ वर्षे, रा.खंडोबा बाजार परभणी,शेख समीर शेख मदान रा.खंडोबा बाजार परभणी,शेख इसाक शेख जाफर रा.धार रोड परभणी,शेख मुजम्मील शेख अब्दुल,शेख अली शेख बाबुरा. धाररोड परभणी,शेख मोबीन शेख इस्माईल रा.धार रोड परभणी ता. जि. परभणी यांचे विरोधात गुरनं १८९\२०२४ कलम ५अ,५ब,९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण प्रतिबंध अधिनियम २०१५व सहकलम३.११ प्राण्यास क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० तसेच प्राण्याचे परिवहन अधिनियम १९७८ कलम ४७ ,५०,५६ द्वारे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सदरील गुन्ह्याचा पुढील तपास काळे करीत आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या