🌟शहरातील आयटीआय चौक जवळील हॉटेल ताज पाटील येथे अभिवादन सभेचे आयोजन🌟
नांदेड - छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात शहिद झालेले जनार्दन मवाडे, पोचीराम कांबळे आणि गौतम वाघमारे यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी हुतात्मा स्मारक समितीच्यावतीने उद्या रविवारी दि.०४ ऑगस्ट रोजी दुपारी ०३.०० वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील आयटीआय चौक जवळील हॉटेल ताज पाटील येथे उद्या रविवार दि.४ जुलै रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी दूरसंचार विभागाचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक आर. बी.मादले हे राहणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून के. एस. हरिदास आणि दिगंबर मोरे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच यावेळी शामदादा गायकवाड, अॅड. गोपाळ भगत ( मुंबई ), पँथर चंद्रकांत ठाणेकर ( देगलूर ), डॉ. संजय अपरांती ( नाशिक), अरविंद सोनटक्के (आयआरएस ), भिमपुत्र टेक्सास गायकवाड ( पुणे ), माधवराव जमदाडे (नांदेड ), श्याम निलंगेकर (नांदेड ), डॉ. शत्रुघ्न जाधव ( हिंगोली ), रमेशभाई खंडागळे (औरंगाबाद ), गौतम मोरे, मारोतराव साळवे, भीमसेन कांबळे, विलास कटारे, अनंत भवरे ( औरंगाबाद ), अरुण गाडे ( नागपुर ), विलास भालेराव ( लातुर ), भीमप्रकाश गायकवाड ( परभणी), बंधुराज लोणे (मुंबई), भीमराव भूरे, दिगंबर मोरे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अविनाश नाईक हे करणार असून प्रसिद्धी प्रमुख म्हणून भय्यासाहेब गोडबोले, माधव गोधणे आणि जयवर्धन भोसीकर हे काम पाहणार आहेत. तरी या अभिवादन सभेला आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समितीचे इंजि. भरतकुमार कानिंदे, टी.पी. वाघमारे, आर.सी. कांबळे, काकासाहेब डावरे, अभि.डी.डी. भालेराव, इंजि. अशोक गायकवाड, राजकुमार सिंदगीकर, अरुण केसराळीकर, इंजि. मिलिंद गायकवाड, इंजि. वसंत वीर, इंजि. दिपक बनसोडे, स्टेशन प्रबंधक देविदास भीसे, इंजि. भिमराव हाटकर, इंजि. गणपत गायकवाड, संजय वाघमारे, यशवंत थोरात, प्रा. प्रल्हाद इंगोले, साहेबराव पुंडगे, इंजि. भिमराव धनजकर, हिरामन वाघमारे, एस.टी. पंडीत, सम्राट हाटकर, रमेश दुधमल, कोंडीबा वासाटे, प्रेमानंद घुले, गौतम खिराडे, साहेबराव भोरगे, सरपाते खडकीकर, ईश्वर सावंत, मिलींद कदम, देवानंद तारु, अशोक भवरे, देविदास ढवळे, नागोराव ढवळे, दिलीप हनुमंते, वसंत सोनकांबळे, विजय पोपुलवार आदींनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे......
0 टिप्पण्या