🌟अवयव दान हे आजच्या पिढीसाठी जीवनदान - डॉ.के राजकुमार


🌟पुर्णेतील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात अवयव दान दिना निमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते🌟 

पुर्णा : पुर्णा येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात आज शनिवार दि 03 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विभाग अंतर्गत अवयव दान दिनाबद्दल जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद एकलारे हे अध्यक्षस्थानी होते. 

यावेळी संस्थेचे सचिव अमृतराज कदम सहसचिव गोविंद कदम संचालक सूर्यकांत कदम यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना प्राचार्यांनी म्हटले की जगामध्ये स्पेन हा देश अवयवदानात पहिल्या क्रमांकावर असून इंग्लंड, अमेरिका, हाँगकाँग, जपान आदी देशात एक लाख मृत्यूच्या मागे ५० जण अवयवदान करतात. त्या प्रमाणात भारतात हे प्रमाण खूपच कमी आहे. म्हणूनच ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ या नव्या संकल्पनेनुसार कुटुंबातील प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प केला पाहिजे.धडधाकट माणसे अपघातात मृत्यू पावतात. कुणाला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होतो. कुणाचा मेंदूमृत होतो, अशावेळी त्यांच्या शरिरातील अवयव गरजूंना देणे याच्यापेक्षा मोठे कार्य नाही. मृत व्यक्तिच्या अंत्यसंस्कारा नंतर शरिरातील चांगले अवयव नष्ट होतात. त्यापेक्षा त्यांच्या अवयव दानामुळे गरजू रुग्ण जर मरणाच्या दारातून परत येणार असेल व तो पुढे चांगले आयुष्य जगणार असेल तर अवयवदानासारखे महान काम नाही. असे युवावर्गामध्ये जनजागृती करण्याचे आव्हान माननीय प्राचार्य यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ शिवसांब कापसे व डॉ. गजानन कुरुंदकर ,डॉ. विजय पवार डॉ. जितेंद्र पुल्ले, डॉ रवी बरडे, डॉ.गंगाधर कापुरे, श्री बाळासाहेब कुलकर्णी, कार्यक्रमाधिकारी डॉ. पुष्पा गंगासागर, व  प्राध्यापक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विजय पवार यांनी केले व आभार डॉ. गंगाधर कापुरे यांनी मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या