🌟यावेळी सकल मराठा समाज बांधवांसह शहरातील नागरिकांची मोठ्या उपस्थिती🌟
पुर्णा (दि.०१ ऑगस्ट २०२४) :- पुर्णा शहरातील सकल मराठा समाज व शहरवासीयांकडून मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त, आज गुरुवार दि.०१ ऑगस्ट रोजी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथमतः सकाळी ०९.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती संभाजी महाराज,महात्मा बसवेश्वर, यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. व त्यानंतर १०.०० वाजता मुळेंचा मारुती मंदिर आणि १०.०० वाजता वरदानी मारुती मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. दुपारी १२.०० वाजता महिलांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप एक वाजता महादेव मंदिर परिसरातील जिल्हा परिषद शाळेत महापुरुषांच्या प्रतिमा भेट व तसेच अंगणवाडीत लखनभैय्या ठाकूर यांच्या हस्ते खाऊ वाटप आदी कार्यक्रम संपन्न झाले......
0 टिप्पण्या