🌟मंगरुळपीर तहसिल प्रशासनाला 'महसुल पंधरवडा' कार्यक्रमाचा पडला विसर....?


🌟लोकाभिमुक कामांचा निपटारा करण्यासाठी 'महसुल पंधरवडा' साजरा करण्याचे आहेत आदेश🌟

🌟मंगरुळपीरच्या महसुल विभागाला जनतेप्रती दिसते अनास्था🌟

फुलचंद भगत

वाशिम :- महसुल दिनानिमित्त लोकाभिमुख कामांचा निपटारा करण्यासाठी 'महसुल पंधरवडा' साजरा करण्याचे आदेश असतांनाही मंगरुळपीर येथील महसुल विभागाला माञ या महसुल दिनाचा विसर पडलेला दिसत आहे.महसुल पंधरवड्यामध्ये घ्यावयाच्या कार्यक्रमाची दि.१ आॅगष्ट रोजी कुठलीही सुरुवात,जनजागृती आणी प्रसिध्दी माध्यमावरही कोणतीही प्रसिध्दी नसल्यामुळे महसुल दिनाचीच मंगरुळपीरच्या महसुल पंधरवड्याचा विसर तर पडला नाही ना?असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.असा गलथान कारभार असल्यास जनतेने या विभागाकडुन लोकाभिमुख कामांची तरी अपेक्षा कशी करावी असाही प्रश्न यानिमित्ताने ऊपस्थीत होत आहे.

             महसुल दिनानिमित्ताने महसुल विभागाने वर्षभर केलेल्या विविध लोकाभिमुख कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दरवर्षी दि.१ आॅगष्ट रोजी महसुल दिन सर्व राज्यभर साजरा करण्यात येतो.जनतेला अधिक दर्जेदार सेवा ऊपलब्ध करुन देण्यासाठी यावर्षी दि.१ आॅगष्ट ते दि.१५ पर्यत 'महसुल पंधरवडा'चे आयोजन करण्यात आले आहे.महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसुली कामे वेळच्यावेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसुलीच्या नोटीसेस पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणाची चौकशी करणे इ. कामे वेळच्यावेळी व वेळापत्रकानुसार करणा-या अधिकारी / कर्मचाऱ्यांचा आणि महसुली वसुलीचे उदिष्ट पार करणा-या अधिकारी / कर्मचा-यांचा सत्कार करण्याकरिता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता दिनांक १ ऑगस्ट, हा दिवस " महसूल दिन" म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. यावर्षी महसूल दिनापासून म्हणजेच दिनांक १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात 'महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असा यामागचा ऊद्देश असतो परंतु मंगरुळपीर महसुल विभागालाच या दिनाचा विसर पडल्याने वरिष्ठ प्रशासनाने याबाबीची दखल घेवुन सबंधितांना याविषयी जाब विचारावा अशी मागणी होत आहे.


*असा आहे महसुल पंधरवडा कार्यक्रम*

दि.1 ऑगष्ट

महसूल दिन साजरा करणे व महसूल पंधरवडा,मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना

दि. २ ऑगस्ट

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

दि. ३ ऑगस्ट

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

दि. ४ ऑगस्ट

स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय

दि. ५ ऑगस्ट

कृषी मार्गदर्शन आणि सलोखा योजना व अभय योजना मार्गदर्शन कार्यशाळा

दि. ६ ऑगस्ट

शेती, पाऊस, दाखले आणि नोंदणीकृत मुळ दस्त परत करणे

दि. ७ ऑगस्ट युवा संवाद

दि. ८ ऑगस्ट महसूल जन संवाद 

दि. ९ ऑगस्ट महसूल ई-प्रणाली

दि. १० ऑगस्ट

सैनिक हो तुमच्यासाठी

दि. ११ ऑगस्ट आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन

दि. १२ ऑगस्ट

एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा

दि. १३ ऑगस्ट महसूल अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी संवाद व प्रशिक्षण

दि. १४ ऑगस्ट

महसूल पंधरवडा वार्तालाप

दि. १५ ऑगस्ट

महसूल संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता समारोह

प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या