🌟हैदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास🌟
नांदेड (दि.२६ ऑगस्ट २०२४) :- नांदेड लोकसभा मतदारसंघावर आज २६ जानेवारी २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांचे तेलंगणा राज्याची राजधानी असलेल्या हैद्राबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाल्याने दुःखाचे सावट पसरले असून नुकतयाच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार वसंतराव चव्हाण हे महाविकास आघाडीकडून बहुमताने निवडून आले होते आहे त्यांच्या पार्थिवावर नायगाव येथील हनुमान मंदिराच्या बाजूस दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईक व गावकऱ्यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पक्षाच्या बैठकीसाठी दिल्ली, मुंबई सह जिल्ह्यातील विविध ठिकाणी जात होते. तसेच विधानसभा निवडणूकीचा भार हि त्यांच्यावर असल्यामुळे दररोज पक्षाच्या बैठका, नियोजित दौरे, जनतेच्या गाठीभेटी, विविध कार्यक्रमाला त्यांची प्रमुख उपस्थिती राहत होती. कांही वर्षांपासून ते यकृतच्या आजाराने त्रस्त असले तरी पक्षासाठी व कार्यकर्त्यांसाठी वेळ देत होते
अशातच दैनंदिन धावपळीमुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु कमी रक्तदाबामुळे त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारर त्यांना १३ ऑगस्ट रोजी एअर ऍम्ब्युलन्सने हैद्राबाद येथे नेण्यात आले. उपचारादरम्यान ७० वर्षीय वसंतराव चव्हाण त्यांचे २६ ऑगस्ट रोजी पहाटे निधन झाले. नुकत्याच झालेल्या यांचा पराभव केला होता...
0 टिप्पण्या