🌟पुर्णेतील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय माइक्रोबियल फूड फेस्टिवलचे आयोजन🌟
पुर्णा (दि.०९ ऑगस्ट २०२४) :- “सुक्ष्मजीव हे विज्ञान, परंपरा आणि पाककला यांचा संगम साधणारे प्रमुख घटक आहेत. सुक्ष्मजीवांच्या योग्य वापरामुळे अपायकारक जिवाणू रोखता येतात, त्यामुळे अन्नाच्या सुरक्षिततेची हमी मिळते. हे सुक्ष्मजीव अन्न उत्पादन, सुरक्षितता आणि अन्नाच्या चवीत विविधता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भुमिका बजावतात. खाद्यपदार्थ बनवताना त्यामध्ये विविध सुक्ष्मजीवांचा योग्य वापर करायला हवा” असे प्रतिपादन श्री गुरु बुद्धिस्वामी शिक्षण संस्थेचे सहसचिव तसेच स्वारातिम विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य श्री गोविंद कदम यांनी केले. सूक्ष्मजीव आणि खाद्य संस्कृती यांचा संबंध विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय,पुर्णा तर्फे "माइक्रोबियल फूड फेस्टिवल" चे आयोजन करण्यात आले होते, त्याच्या उद्घाटन प्रसंगी श्री गोविंद कदम बोलत होते.
यावेळी प्राचार्य डॉ के राजकुमार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सुक्ष्मजीव अन्न निर्मती, साठवण आणि नवीन पाककृती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कसे योगदान देतात हे पण या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना समजले. लोणी, दही, पनीर, ब्रेड,पापड,श्रीखंड,जिलेबी,इडली, ढोकळा, दोसा, आप्पे,चीज, आंब्याचे लोणचे, उडद पापड, केक हे सर्व पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवून सादर केले. हे पदार्थ बनवण्यासाठी लॅक्टोबॅसिलस जिवाणू आणि सकॅरोमायसिस बुरशी सारख्या सुक्ष्मजंतूंचा वापर केला जातो. हे सुक्ष्मजीव अन्नाच्या घटकांमध्ये बदल करून त्यांना अधिक चवदार आणि पौष्टिक बनवतात. या कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन सुक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.दैवशाला कमठाणे आणि डॉ.रविंद्र राख यांनी केले. कु. सृष्टि चिद्रवार, कु अबोली सोनुले, कु धुतराज संजीवनी, कु धुतराज सुहानी, कु शुभांगी काकडे, कू आकांक्षा गर्ग, कु ऋतुजा बुद्धे, कु प्रतीक्षा कसारे, कु फारेहिन इरम, नवनाथ मोरे, रामलिंग कीर्तनकार, कु प्रेरणा धुतराज, कु पायल राजभोज आणि कु सय्यद आलियाबुतुल या विद्यार्थांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रस्तावना कु सृष्टी चिद्रवार ने केले. कू शुभांगी काकडेनी यांनी आभार मानले. यात बी.एस्सी.प्रथम वर्ष आणि बी.एस्सी.द्वितीय च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उपप्राचार्य गजानन कुरुंदकर, डॉ शिवसांब कापसे, डॉ संजय दळवी, डॉ जितेंद्र पुल्ले,डॉ रवी बर्डे, डॉ अजय कुऱ्हे, डॉ बालासाहेब मुसळे, दो अलका कौसडीकर, डॉ पल्लवी चव्हाण आणि डॉ वृषाली आंबटकर हे सर्व प्राध्यापक यावेळी उपस्थित होते. श्री संजय कापुरे, कालिदास वैद्य, भागुसिंह बायस यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.......
0 टिप्पण्या