🌟राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटने बाबत मुख्यमंत्र्यांना काँग्रेस सोशल मीडियाचे निवेदन...!


🌟या घटनेतील दोषींवर कठोर कारवाही करण्या🌟

परभणी/पुर्णा :- मालवण येथील राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी  महाराजांचा पुतळा राजकीय हेतू ठेऊन घाई गडबडीत कुठल्याही निकषांचे पालन न करता उभारण्यात आला होता.

सदर प्रतिकृती  हि इतिहास व पर्यावर्णाच्या  निकाशाशी सुसंगत नसून अत्यंत निकृष्ट  दर्ज्याचे साहित्य वापरल्याचे लक्षात येत आहे.पुतल्याचे  शिल्पकार व कान्त्राकदार हे नामांकित व अनुभवी नसतानाही त्यांच्याकडून हे शिल्प तयार करून घेण्यात आले होते त्यामुळे त्यांच्याकडून सदर पुतळ्याच्या निर्मितीत चुका झाल्या आणि सदर पुतळा हा एक वर्षाच्या आताच स्तानिक  परीस्तीतीत  अति सामान्य वादळातही सदर पुतळा हा जमीन दोस्त झाला. म्हणून लाखो करोडो शिव भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

त्या करिता या घटनेतील दोषींवर कठोर कारवाही करण्यात यावी व सदर कंत्राटदार कायमचे ब्लाक्लिस्ट  करण्यात यावे . दोषी शिल्पकार यांच्यावर कारवाई करून त्याला अदा केलेली रक्कम वसूल करावी तसेच महाराष्ट्रातील सगळ्या शिवस्मारकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून गरज असेल त्याठिकाणी योग्य ती डागदूजी करण्यात यावी. निवेदनावर परभणी जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष निखिल धामणगावे, तालुकाध्यक्ष प्रल्हाद पारवे, जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत डाके, मागासवर्गीय तालुकाध्यक्ष सदाशिव वाटोडे, सेवादल तालुकाध्यक्ष विश्वनाथ मोरे, मागासवर्गीय शहराध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, शहर उपाध्यक्ष पांडुरंग कदम, तालुका उपाध्यक्ष तातेराव ढोणे, शहर उपाध्यक्ष प्रशांत घाडगे, विठ्ठल कापुरे, बालाजी ऋतुराज, पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या