🌟श्रावण मासानिम्मीत व तसेच विपुल प्रमाणात सु-पर्जन्यवृष्ठी होण्यासाठी श्री रूद्रअभिषेक व पर्जन्य सूक्तपाठाची सेवा....!


🌟प.पु.गुरुमाऊलींचे सुपुत्र आ.श्री चंद्रकांत दादासाहेबांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र घृष्णेश्वर व श्री क्षेत्र परळी वैजनाथ धार्मिक उपक्रम🌟 


अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा मार्ग (दिंडोरी प्रणीत ) सेवा -मार्गा च्या वतीने श्रावण मासानिम्मीत व तसेच विपुल प्रमाणात सु-पर्जन्यवृष्ठी होण्यासाठी. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ  गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर चे प्रमुख तथा प.पु.गुरुमाऊलींचे सुपुत्र आ.श्री.चंद्रकांत दादासाहेब हे दि. 12 ऑगस्ट रोजी पासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत यामध्ये दि. 12 ऑगस्ट रोजी ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र घृष्णेश्वर येथे व तसेच, दि. 13 ऑगस्ट रोजी ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र परळी वैजनाथ या दोन्ही ठिकाणी श्री चंद्रकांत दादासाहेब यांच्या उपस्थिति मध्ये व सेवा-मार्गातील हजारों  सेवेकऱ्यांच्या उपस्थिति मध्ये श्रावण मासानिम्मीत व तसेच विपुल प्रमाणात सु-पर्जन्यवृष्ठी होण्यासाठी श्री रूद्रअभिषेक व पर्जन्य सूक्तपाठा ची सेवा आयोजित करण्यात आली होती. 

तसेच उद्या दि. 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्रदिनी सकाळी 10:00 वा. 8 वे ज्योतिर्लिंग असलेले श्री क्षेत्र औढा नागनाथ येथे श्री वृंदावन लॉन्स या ठिकाणी  श्री चंद्रकांत दादासाहेब यांचे अमृततुल्य हितगुज व श्री रूद्रअभिषेक व पर्जन्य सूक्तपाठा ची सेवा आयोजित करण्यात आली आहे. तसेच सायंकाळी 4:00 वा. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, शिवाजीनगर परभणी या ठिकाणी  श्री चंद्रकांत दादासाहेब यांचे अमृततुल्य हितगुज व श्री रूद्रअभिषेक व पर्जन्य सूक्तपाठा ची सेवा आयोजित करण्यात आली आहे......

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गा च्या वतीने नांदेड़, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त सर्व नागरिक, भाविक -भक्त, व सेवेकऱ्यांनी या सेवा उपक्रमा मध्ये सहभागि होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या