🌟महसूल प्रशासनातील अकार्यक्षम कारभार चव्हाट्यावर : गौण खनिज वाळू तस्करांचा महसूल प्रशासनाच्या पाठबळातून धुमाकूळ🌟
पुर्णा (परखड सत्य) :- पुर्णा तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांना अल्पशा दरात निवासस्थानाच्या बांधकामासाठी वाळू उपलब्ध व्हावी याकरिता परभणी जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व महसूल प्रशासनाच्या निर्देशानुसार तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर (लक्ष्मीनगर) येथील शासकीय वाळू डिपो लिलावात येथील प्रविण अग्रवाल यांच्या नावावर सुटला होता पिंपळगाव बाळापूर येथील शासकीय वाळू डिपो व्यतिरिक्त संपूर्ण तालुक्यात कुठेही शासकीय वाळू डिपो किंवा अधिकृत वाळू धक्का नसतांना व पिंपळगाव बाळापूर येथील वाळू डिपो लिलावधारक व अग्रवाल यांनी मागील ०९ जुन २०२४ रोजीच अधिकृतरित्या रितसर वाळू डिपो बंद करुन महसूल प्रशासनाच्या स्वाधीन केल्यानंतर देखील पुर्णा-गोदावरी नदीपात्रांतून अनधिकृतपणे प्रचंड प्रमाणात प्रतिरोज हजारों ब्रास वाळूचे उत्खनन करून या चोरट्या वाळूची वाळू तस्करांकडून पुर्णा शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या शासकीय विकासकामांच्या गुत्तेदारांना विक्री होत असतांना तहसिलदार माधवराव बोथीकर व महसूल प्रशासनातील अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत की काय ?
असा प्रश्न उपस्थित होत असून महारेल (एमआरआयडीसी) अंतर्गत मागील २७ ऑगस्ट २०१९ पासून संथगतीने सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपूलाची बांधकाम गुत्तेदार कंपनी गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा.ली.या कंपनीला अवैध वाळू तस्करांकडून कोट्यावधी रुपयांचा शासकीय महसूल बुडवून मागील जवळपास पाच वर्षांपासून विदाऊट रॉयल्टी लाखों ब्रास वाळूचा साठा पुरवला जात असतांना तहसिलदार यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे भान ठेवून संबंधित गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा.ली.या कंपनीला आपण कोणत्या अधिकृत वाळू लिलावधारकाकडून इतक्या मोठ्या प्रमाणात वाळूची खरेदी केली व आतापर्यंत वाळू/मुरुम खरेदी संदर्भात महसूल प्रशासनाकडे किती महसूल जमा केला या संदर्भात कुठल्याही प्रकारची विचारपूस केली नसल्यामुळे शंकेची पाल चुकचुकतांना दिसत असून रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामाचे टेंडर घेतलेल्या गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा.ली.या कंपनीने पुर्णा-पांगरा ढोणे मार्गावरील दुरसंचार विभाग कार्यालयासमोरील पुर्णा-अकोला लोहमार्गालगतच उभारलेल्या मिक्सर प्लॉन्ट परिसरात जवळपास पाच सहाशे ब्रास अवैध वाळूसाठ्याचे डोंगर उभारले असून सदरील चोरट्या वाळूचा साठा संबंधित कंपनीने अवैधरित्या वाळू तस्करांकडून खरेदी केल्याचे सख़ोल चौकशीअंती सिध्द होईल परंतु चौकशी करणार कोण ? 'हमाम में सभी नंगे' अशी परिस्थिती सर्वत्र झाल्याचे पाहावयास मिळत असून गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा.ली.या कंपनीने पुर्णा-पांगरा ढोणे मार्गावर उभारलेल्या मिक्सर प्लॉन्ट वरील प्रचंड प्रमाणात जमा केलेल्या वाळूसाठ्याची सविस्तर माहिती पुराव्यांसह महसूल प्रशासनाचे अधिकारी तथा नायब तहसिलदार श्री थारकर यांना देण्यात आली असून कारवाई करण्या संदर्भात रितसर लेखी अर्ज देखील देण्यात आला असून यावर संबंधित अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.......
0 टिप्पण्या