🌟पुर्णा रेल्वे स्थानकावर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन...!


🌟यावेळी माजी नगराध्यक्ष तथा अल्पसंख्याक समाजातील उभरते धाडसी नेतृत्व हाजी साहेब कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती🌟 

 पुर्णा (दि.०१ ऑगस्ट २०२३) :-पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानकावर आज गुरुवार दि.०१ ऑगस्ट रोजी साहित्यसम्राट डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील उभरते धाडसी नेतृत्व तथा पुर्णा नगर परिषदेचे माजी नगरअध्यक्ष हाजी साहेब कुरेशी,मातंग समाजातील जेष्ठ नेते उत्तम गायकवाड, विनोद गायकवाड,सुधाकर गायकवाड,संजय शिंदे, मिलिंद सोनकांबळे, मन्सूर (उर्फ पंडु) सेठ ,नारायण गायकवाड,गोविंद लोंढे,बंडु मोरे दीपक बुरड, अमोल गायकवाड सचिन गायकवाड ,शामराव खंदारे, अनिल भिसे ,प्रशांत गायकवाड.प्रकाश गायकवाड आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.......‌‌

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या