🌟राज्यस्तरीय कवी संमेलनात कवी उमाजी उर्फ उमेश बाऱ्हाटे यांचे अप्रतिम ओवी गायन.....!


🌟महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच गुजरात येथून देखील नामांकित कवी कवयित्री यांनी या सोहळ्यास लावली हजेरी🌟 


शिर्डी येथे रविवार २८जुलै रोजी भारतीय सांस्कृतिक मंच अहमदनगर विभाग आयोजित करण्यात आले होते या कवी संमेलनात पुर्णा जिल्हा परभणी येथील कवी उमाजी उर्फ उमेश बाऱ्हाटे याचे उत्कृष्ट आधुनिक ओवी चे सादरीकरण झाले शिर्डी येथील शांतीकमल हाॅटेलच्या प्रशस्त हाॅल मध्ये हा काव्योत्सव संपन्न झाला.या संमेलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच गुजरात येथून देखील नामांकित कवी कवयित्री यांनी या सोहळ्यास हजेरी लावली.


या प्रथम राज्य स्तरीय कवी संमेलनाचे आयोजन अहमदनगर विभाग समितीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोरे सहप्रशासिका ऍड., अक्षशिला शिंदे नागपूर,महिलाध्यक्षा भावना गांधीले कोषाध्यक्षा सुवर्णा वाणी सचिव बाळासाहेब रोहकले, डॉ धनंजय जगताप यांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम पार पडला या कविसंमेलनासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे सुप्रसिद्ध वकील शिरीन वारे तसेच २०२२ च्या मिस इंडिया फिटनेस विजेत्या विजया लक्ष्मी यादव तसेच सुप्रसिद्ध लेखक वैभव धर्माधिकारी, सुमनताई मुठे, डॉ श्रध्दा वासिमकर संस्थापक उपाध्यक्ष विजय जायभाये आदी उपस्थित होते सर्वांच्या एकापेक्षा एक बहारदार कवितांनी सर्वांचे मन जिंकून घेतले.साई नगरीत रंगलेल्या या सोहळ्यास सर्वांनी चांगलाच प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत गोरे व अक्षशिला शिंदे यांनी केले साहित्यिक हा समाज घडवत असतो त्यामुळे त्याच्या लेखणीतून सामाजिक गोष्टी प्रकर्षाने पुढे यायला हव्यात हा छानसा संदेश प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतातून दिला योग हा निरोगी शरीरासाठी एक गरज आहे हा संदेश देता देता स्वतला वाचनाची मराठी साहित्याची रुची कशी निर्माण झाली यावर मिस इंडिया विजया लक्ष्मी मॅडम यांनी उत्कृष्ट भाष्य केले वेगवेगळ्या विषयांवर सर्व ७० कवी कवयित्री यांनी सुंदररित्या सादरीकरण करत या सोहळ्याचा आनंद लुटला तसेच विद्या मोरे, सुमनताई मुठे, श्रध्दा वाशिमकर,सौ.शुभांगी अतकरी,सुरेखा जोगदे संजय महाजन यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या कवी संमेलनात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी राज्याच्या विविध भागातून मान्यवरांच्या शुभेच्छा प्राप्त झाल्या सध्या राज्यभर या कविसंमेलनाची चर्चा व कौतुक गाजत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या