🌟तर उपाध्यक्षपदी संगीता भोसले यांची निवड🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील सुहागण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीची निवडणूक आज शुक्रवार दि.02 ऑगस्ट 2024 रोजी पार पडली.
यावेळी शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत समिती अध्यक्षपदी खुशाल भवानजी भोसले तर उपाध्यक्ष पदी संगीता पांडुरंग भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सदस्य पदी विठ्ठल रामजी भोसले, त्रिशला कैलास खरे, राम वाघमारे, मंगल दादाराव गायकवाड, उत्तम भालेराव, सीमा बालाजी भोसले तर शिक्षणप्रेमी सदस्य पदी सय्यद कलीम सय्यद पाशा यांची निवड झाली. मुख्याध्यापक साईनाथ रामोड हे समितीचे पदसिद्ध सचिव म्हणून असतील. रामराजे भोसले यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुहागन या शाळेला अल्पावधितच नावलैकिक मिळालेला असून आय.एस.ओ. मानांकन दर्जा देखील मिळालेला आहे. नवनियुक्त समितीच्या निवडीनंतर मावळते अध्यक्ष सुरेश भोसले यांनी मोठे सहकार्य केले त्याचप्रमाणे नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यही करतील अशी अपेक्षा जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले यांनी व्यक्त केली. यावेळी सहशिक्षक गंगाधर लोखंडे, सुर्यकांत खानापूरकर, हिरामण वैद्य, चेअरमन सुभाष भोसले, मनसे तालुकाध्यक्ष आनंद बुचाले, नारायण भोसले, माजी उपाध्यक्ष आत्माराम वाघमारे, माजी सदस्य राजकुमार भोसले, गंगाधर भोसले, पुरभाजी भोसले उपस्थित होते. गावातील सुनील भोसले, सोनाजी शिंद, संदीप भोसले, बालाजी भोसले, सुंदर भोसले, पीएसआय ज्ञानेश्वर भोसले, ग्रामपंचायत सदस्य माऊली भोसले, नारायण भोसले, व पालक भागवत भोसले, दिपक भोसले, आंबादास भोसले व इतर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मावळते अध्यक्ष सुरेश भोसले यांनी केलेल्या प्रयत्नाप्रमाणेच आदर्श शाळा करण्याच्या दृष्टीकोणातून आम्ही सर्वजण प्रयत्न करू असे मत नवनियुक्त अध्यक्ष खुशाल भोसले यांनी व्यक्त केले......
0 टिप्पण्या