🌟परभणीत जयंतीनिमित्त आप तर्फे अण्णाभाऊ साठे यांची 1001 पुस्तके वाटप🌟
परभणी - आम आदमी पार्टी तर्फे बस स्टॅन्ड जवळील अण्णाभाऊंच्या पुतळा परिसरात 1001 पुस्तके वाटप करून अण्णाभाऊंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
महामानव हे डोक्यावर घेऊन नाचायचे नसतात तर त्यांचे विचार डोक्यात घेऊन आचरणात आणायचे असतात, हेच महामानवांच्या जयंती चे खरे अभिवादन असते. त्यामुळे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिखाण केलेले माझा रशियाचा प्रवास, फकीरा, माकडीचा माळ, वारणेचा वाघ इत्यादी पुस्तके आज जयंतीच्या निमित्ताने उपस्थित समाज बांधवांना विनामूल्य वाटप करण्यात आली. जयंती साजरी करत असताना डीजे मिरवणूक दिंडी रॅली अन्नदान हे कार्यक्रम आपण नेहमीच घेत असतो परंतु महामानवांचा विचार यातून मागे पडायला नको म्हणून त्यांचे लिखाण/ साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असते आणि याद्वारे महामानवांचे भक्त ते खरे अनुयायी असा प्रवास चालू होतो आणि तोच समाजाला पुढे घेऊन जाणारा असतो, असे मत आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांनी यावेळी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार दिल्याने या पुरस्काराची उंची आणखी वाढेल त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार द्यावा. उपस्थित प्रत्येक समाज बांधवांच्या हातामध्ये अण्णाभाऊंचे पुस्तके दिसत होती त्यामध्ये शाळेतील मुले ज्येष्ठ महिला पुरुष युवा वर्ग यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. सरते शेवटी अण्णाभाऊ जयंती उत्सव समिती चे कॉम्रेड गोरे व विश्वनाथ गवारे यांचे आप तर्फे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सरस्वती पांडुरंग बोबडे मुंजाभाऊ वाकोडे अक्षय जोगदंड शेषराव खंदारे प्रल्हाद झाडे शेख शकील सुरज उदावंत नामदेव बोबडे रमेश झाडे रामभाऊ राऊत विजयकुमार झाडे अभिषेक पंडित रणजीत भोसले गंगाधर झाडे ज्ञानेश्वर झाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
0 टिप्पण्या