🌟तालुक्यातील कंठेश्वर गावासह ग्रामीण भागात सर्वत्र दहशतीचे वातावरण🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील कंठेश्वर गावात मंगळवार दि.१३ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यरात्री ०२.०० ते ०२.०० वाजेच्या सुमारास अज्ञात शसस्त्र दरोडेखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घालत चार घर व पानपट्टी फोडण्याची तर एका वयोवृद्ध इसमावर चाकू हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
या संदर्भात सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दि.०२.०० ते ०२.३० वाजेच्या मध्यरात्रीच्या सुमारास अंदाजे तीन ते चार अज्ञात चड्डी बनियान घातलेले व कंबराला धारदार शस्त्र लावलेले दरोडेखोर कंठेश्वर गावात घुसले व त्यांनी श्रीरंग माणिकराव कदम यांच्या स्वयंपाक घराचा दरवाजा तोडून भांड्यांची तोडफोड केली भांड्यांची यानंतर ज्ञानेश्वर कदम यांच्या घराचा दरवाजा तोडून घरातील कानातले झुंबर चैन आणि त्यांच्या आईचे पैसे बहिणीची पोत आणि लहान लेकराचे काही सोन्या चांदीचं सामान पळवले तर याच गावातील प्रदीप उत्तमराव ढगे यांच्या घराचे गेट तोडून कपाटातील काही सामान आणि पैसे देखील पळवले तर गावातील नाशिक झिंजाडे यांची पानपट्टी फोडून पानपट्टीतील काही सामान देखील पळवले चोरी दिली यानंतर याच गावातील प्रकाश ढगे यांच्या घरातील सोन्याचे काही दागिने आणि पैसे देखील पळवले असल्याचे समजते या अज्ञात शसस्त्र दरोडेखोर एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी याच गावातील शेख अल्लाउद्दीन पाहिल्या क्षणी त्यांना विचारपूस केली असता त्यांच्यावर चाकू हल्ला केल्याने त्यांच्या कपाळावर गंभीर जखमी झाली असल्याचे समजते दरम्यान या अज्ञात शसस्त्र दरोडेखोर घराचं गेट तोडतेवेळी मध्यरात्री ०२.२१ वाजेच्या सुमारास एका घरासमोरील सिसीटीव्हीत कैद झाले आहेत......
0 टिप्पण्या