🌟पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील लाचखोर तलाठी दत्ता होणमाने यास न्यायालयीन कोठडी.....!


🌟शेतकर्‍याकडून फेरफार करीता ४० हजार रुपयांची लाच घेतांनी एसीबीने रंगेहाथ घेतले होते ताब्यात🌟

 


परभणी : पूर्णा तालुक्यातील एका शेतकर्‍याकडून फेरफारकरीता ४० हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतलेला लाचखोर तलाठी दत्ता होणमाने यास न्यायालयाने आज शनिवार दि.०३ ऑगस्ट रोजी न्यायालयीन कोठडी सूनावली.

             या तलाठ्या विरोधात ताडकळस पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यास ताडकळस पोलिसांनी ताब्यात घेवून न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने या तलाठ्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सूनावली. त्या पाठोपाठ यास न्यायालयासमोर पुन्हा उभे केले असता न्यायालयाने त्या तलाठ्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या